AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Pilot | काँग्रेसचा ‘पायलट’ भाजप एअरलाईन्सच्या वाटेवर, नड्डांच्या उपस्थितीत सचिन पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं

दिल्लीवारीवर असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्याने संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे

Sachin Pilot | काँग्रेसचा 'पायलट' भाजप एअरलाईन्सच्या वाटेवर, नड्डांच्या उपस्थितीत सचिन पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं
| Updated on: Jul 13, 2020 | 10:46 AM
Share

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सत्ताधारी काँग्रेसने रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने व्हीप जारी केला. तर दिल्लीवारीवर असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्याने संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं आहेत (Congress Leader Sachin Pilot likely to join BJP)

पत्रकार परिषदेला राजस्थानचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे, वरिष्ठ प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि वरिष्ठ नेते अजय माकन उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज (सोमवार) सकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी पत्रकार परिषदेच्या अगोदर काँग्रेसने व्हीप बजावला.

“व्हीप मोडल्यास आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. सचिन पायलट आले नाहीत, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, हे नियम सर्वांसाठी समान आहेत” असे अविनाश पांडे म्हणाले. शनिवार-रविवारच्या बैठकांना पायलट गैरहजर होते.

दुसरीकडे, सचिन पायलट यांनी आपल्याकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या 27 आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत गहलोत सरकार अल्पमतात येण्याची चिन्हं आहेत. 27 काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अविनाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की 109 आमदारांनी पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करुन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना दिले आहे. राजस्थानमध्ये भाजपचे षडयंत्र यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. “काँग्रेसचे सर्व आमदार पक्षासोबतच आहेत. काही आमदारांनी गहलोत यांच्याशी फोनवर बोलून पाठिंबा दर्शवला” असे पांडे यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री गहलोत यांनी परवा आम्हाला सांगितले की भाजप कशाप्रकारे आमिष दाखवून सरकार पाडण्याचा डाव आखत आहे. यानंतर सोनिया गांधींनी आम्हाला जयपूरला पाठवले.” असेही पांडे म्हणाले.

हेही वाचा – सचिन पायलट-ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला, राजस्थानमध्ये राजकीय भूंकपाची चिन्हे

सचिन पायलट यांनी काल काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. पायलट आणि शिंदे हे जवळचे मित्र आहेत. दोघांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून राजस्थान सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या जागांच्या गणिताच्या आधारे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार, तर उर्वरित एका जागेवर भाजप उमेदवार राज्यसभेवर पोहोचू शकेल, हे निश्चित झाले होते. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली, पण भाजपने मोठे डावपेच आखल्याचं चित्र आहे.

हेही वाचा – तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी

भाजपने एका जागेसाठी आपले दोन उमेदवार राजेंद्र गहलोत आणि ओंकारसिंग लखावत यांना मैदानात उतरवले आहे. आता काँग्रेसला भीती आहे की भाजप आपला दुसरा उमेदवार जिंकवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी करेल. त्यामुळेच सर्व काँग्रेस आणि समर्थक आमदारांची रिसॉर्टमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

राजस्थानचे पक्षीय बलाबल

  • काँग्रेस – 107
  • काँग्रेस समर्थक अपक्ष – 12
  • काँग्रेस समर्थक इतर – 05
  • भाजप – 72
  • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष – 03
  • भाजप समर्थक अपक्ष – 1

संबंधित बातम्या : 

राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट, दिल्लीहून ज्येष्ठ नेते जयपूरच्या रिसॉर्टमध्ये

Rajasthan Politics | राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत

(Congress Leader Sachin Pilot likely to join BJP)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.