Rajasthan Politics | सचिन पायलट-ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला, राजस्थानमध्ये राजकीय भूंकपाची चिन्हे

नुकतंच उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट (Deputy CM Sachin Pilot meet Jyotiraditya Shinde) घेतली.

Rajasthan Politics | सचिन पायलट-ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला, राजस्थानमध्ये राजकीय भूंकपाची चिन्हे

नवी दिल्ली : मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारही संकटात येण्याची भीती वर्तवली (Deputy CM Sachin Pilot meet Jyotiraditya Shinde) जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे बोलले जात आहे. नुकतंच सचिन पायलट यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजस्थानमधील गेहलोत सरकार अस्थिर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

सचिन पायलट यांनी नुकतंच ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. सचिन पायलट आणि शिंदे हे एकमेकांचे मित्र आहेत. विधीमंडळच्या बैठकी आधी शिंदे आणि पायलट यांच्या भेटीने गेहलोत सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान अशोक गहलोत यांनी काल (शनिवारी) रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. पायलट यांच्यासह काँग्रेसचे 10 आमदार दिल्लीत गेल्याने राजकीय संकट गडद झाल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या जागांच्या गणिताच्या आधारे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार, तर उर्वरित एका जागेवर भाजप उमेदवार राज्यसभेवर पोहोचू शकेल, हे निश्चित झाले होते. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली, पण भाजपने मोठे डावपेच आखल्याचं चित्र आहे.

हेही वाचा – तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी

भाजपने एका जागेसाठी आपले दोन उमेदवार राजेंद्र गहलोत आणि ओंकारसिंग लखावत यांना मैदानात उतरवले आहे. आता काँग्रेसला भीती आहे की भाजप आपला दुसरा उमेदवार जिंकवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी करेल. त्यामुळेच शिवविलास रिसॉर्टमध्ये सर्व काँग्रेस आणि समर्थक आमदारांची रवानगी करण्यात आली (Deputy CM Sachin Pilot meet Jyotiraditya Shinde) आहे.

राजस्थानचे पक्षीय बलाबल

  • काँग्रेस – 107
  • काँग्रेस समर्थक अपक्ष – 12
  • काँग्रेस समर्थक इतर – 05
  • भाजप – 72
  • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष – 03
  • भाजप समर्थक अपक्ष – 1

संबंधित बातम्या : 

राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट, दिल्लीहून ज्येष्ठ नेते जयपूरच्या रिसॉर्टमध्ये

Rajasthan Politics | राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *