AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे राजस्थानमधील सरकारच्या स्थितीवर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली (Kapil Sibal on Rajasthan).

तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 12, 2020 | 6:08 PM
Share

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे (Kapil Sibal on Rajasthan Political Crisis). घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? असा थेट सवाल सिब्बल यांनी विचारला आहे. तसेच राजस्थानमधील पक्षाच्या स्थितीबद्दल काळजीत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं.

कपिल सिब्बल म्हणाले, “घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? पक्षाच्या स्थितीबद्दल काळजी वाटत आहे.” राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. भाजप राजस्थान काँग्रेसचे आणि इतर काही अपक्ष आमदार 10-15 कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारही संकटात येण्याची भीती वर्तवली जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजप राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. तर सचिन पायलट दिल्ली दरबारी पोहोचल्याने चर्चांना ऊत आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अशोक गहलोत यांनी काल (शनिवारी) रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. पायलट यांच्यासह काँग्रेसचे 10 आमदार दिल्लीत गेल्याने राजकीय संकट गडद झाल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

Rajasthan Politics | राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत

Kapil Sibal on Rajasthan Political Crisis

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती