राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट, दिल्लीहून ज्येष्ठ नेते जयपूरच्या रिसॉर्टमध्ये

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांना जयपुरात पाचारण केल्याचं बोललं जातं. (Rajasthan Congress fears BJP Operation Lotus ahead of Rajyasabha Polls)

राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसवर 'ऑपरेशन लोटस'चे सावट, दिल्लीहून ज्येष्ठ नेते जयपूरच्या रिसॉर्टमध्ये

जयपूर : राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट घिरट्या घालत असल्याची चर्चा आहे. राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी जयपूरच्या ‘शिवविलास रिसॉर्ट’मध्ये कॉंग्रेसची खलबतं सुरु आहेत. राजस्थानमध्येही मध्य प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने तातडीची पावले उचलत ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांना दिल्लीहून जयपूरला पाठवले आहे. (Rajasthan Congress fears BJP Operation Lotus ahead of Rajyasabha Polls)

मुख्यमंत्री अशोक गहलोत आज काँग्रेस आमदारांसह बैठक घेणार आहेत. त्यानंतर गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस सरचिटणीस अविनाश पांडे, राज्यसभेचे उमेदवार केसी वेणुगोपाल आणि प्रवक्ता रणदीप सुरजेवाला पत्रकार परिषद घेतील.

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी केसी वेणुगोपाल यांनी प्रयत्न केल्याचं बोललं जातं. राजस्थानमधील काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यांना पैशांची ऑफर दिली जात आहे, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : सोनियांचा अत्यंत विश्वासू सहकारी अचानक ‘मातोश्री’वर, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंकडून स्वागत

अशोक गहलोत यांच्या आरोपांमुळे सचिन पायलट यांच्या समर्थक गटाचा संताप झाला. “अफवांच्या आधारे वातावरण तापवले जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या आमदारांना फोन आले, हे स्पष्ट झाले पाहिजे” अशी मागणी सचिन पायलट यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी केली. यानंतर अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात बैठक झाली.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या जागांच्या गणिताच्या आधारे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार, तर उर्वरित एका जागेवर भाजप उमेदवार राज्यसभेवर पोहोचू शकेल, हे निश्चित झाले होते. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली, पण भाजपने मोठे डावपेच आखल्याचं चित्र आहे.

भाजपने एका जागेसाठी आपले दोन उमेदवार राजेंद्र गहलोत आणि ओंकारसिंग लखावत यांना मैदानात उतरवले आहे. आता काँग्रेसला भीती आहे की भाजप आपला दुसरा उमेदवार जिंकवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी करेल. त्यामुळेच शिवविलास रिसॉर्टमध्ये सर्व काँग्रेस आणि समर्थक आमदारांची रवानगी करण्यात आली आहे. (Rajasthan Congress fears BJP Operation Lotus ahead of Rajyasabha Polls)

राजस्थानचे पक्षीय बलाबल

काँग्रेस – 107 काँग्रेस समर्थक अपक्ष – 12 काँग्रेस समर्थक इतर – 05 भाजप – 72 राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष – 03 भाजप समर्थक अपक्ष – 1

(Rajasthan Congress fears BJP Operation Lotus ahead of Rajyasabha Polls)

Published On - 11:50 am, Fri, 12 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI