मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. शनिवारी रात्री उशिरा अनंत अंबानी (Anant Ambani) हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीमागचं कारण नेमकं काय होतं, हे कळू शकलेलं नाही. मात्र अंबानी-शिंदे भेटीमुळे आता तर्क वितर्क लढवले जात आहेत.