Thane : पालकमंत्री निवडीवर शिंदे सरकारमध्ये अंतर्गत नाराजी, ठाण्यातच ‘हे’ असे घडले..!

| Updated on: Sep 25, 2022 | 5:26 PM

पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर शिंदे सरकारमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे नाराजांना कशी आवर घालावी असा प्रश्न सरकारपुढे आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच असे घडले आहे.

Thane : पालकमंत्री निवडीवर शिंदे सरकारमध्ये अंतर्गत नाराजी, ठाण्यातच हे असे घडले..!
माजी नगरसेवक मंदार टावरे
Follow us on

सुनील जाधल टीव्ही9 प्रतिनिधी ठाणे : राज्यभरातील विकास कामांमुळे आणि तडकाफड घेतले जात असलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वरचष्मा राहिलेला आहेच. शिवाय राज्यभर त्यांच्या सभांनाही जनतेची मोठी गर्दी होत आहे. हे सर्व असले तरी शिंदे गट आणि भाजपात (BJP) सर्वकाही अलबेल असे नाही. कारण पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच ठाण्यातूनच (Thane) नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मिस्टर गुवाहाटी…काही तरी सोडा भूमिपुत्रांसाठी, नाही तर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी फेसबुक पोस्ट भाजपाचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी केली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे समोर आले नसले तरी ही पोस्ट सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शंभूराज देसाई यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपामध्ये नाराजी पसरली आहे. शिवाय माजी नगरसेवकाच्या पोस्टमुळे ठाण्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा असेच चित्र निर्माण झाले आहे.

ठाण्याचे पालकमंत्री हे शंभूराज देसाई हे असले तरी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना डावलून शंभूराज देसाई यांना पालकत्व का दिले असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय फेसबुक पोस्ट करणारे नगरसेवक हे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत.

शिंदे गट आणि भाजपामध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे दाखवले जाते. पण स्थानिक पातळी मतभेद वाढताना पाहवयास मिळत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये तर हे शीत युद्ध सुरुच आहे. पण पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर अधिक तीव्रतेने ते जाणवू लागले आहे.

मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी…काही तरी सोडा भूमिपुत्रांसाठी, नाही तर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी खोचक फेसबुक पोस्ट टावरे यांनी केली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे अद्याप समोर आले नसले तरी या पोस्टने बरेच काही सांगून टाकले आहे.