AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची एका निवडणुकीत दमछाक झाली होती; शहाजी बापूंनी सांगितला ‘त्या’ निवडणुकीचा किस्सा

या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते.

शरद पवारांची एका निवडणुकीत दमछाक झाली होती; शहाजी बापूंनी सांगितला 'त्या' निवडणुकीचा किस्सा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2022 | 10:18 PM
Share

सांगली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे आजवर एकदाही पराभूत झाले नाहीत. मागच्यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. पण ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यांच्याऐवजी त्यांची कन्या सुप्रिया सुळे (supriya sule) या बारामतीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. शरद पवार आणि बारामतीचं नातं अत्यंत घट्ट आहे. असं म्हणतात, पवार फक्त बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुरते जात. बाकी इतर उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज्यभर फिरत. पवारांना निवडून आणण्याचं काम मात्र, बारामतीकर प्रामाणिकपणे करत. पवार आणि बारामतीचं समीकरण इतकं घट्ट असल्याचं यातून दिसून येतं. पण गेल्या काही दिवसांपासून भाजपने बारामतीवर लक्ष केलं आहे. पवार कुटुंबीयांचा बारामतीत पराभव करण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. त्यातच शिंदे गटाचे आमदार शहजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी पवारांचा एका निवडणुकीत कसा घामटा निघाला होता, याची आठवण करून देऊन भाजपच्या उत्साहाला बळ देण्याचा प्रयत्नच केला आहे.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधताना शरद पवारांनाही कामाला लावणाऱ्या एका निवडणुकीवर भाष्य केलं. राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं सांगतानाच वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती. हे सुद्धा विसरता येणार नाही, असेही शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.

ठाकरेंचे आमदार फुटणार

इथे आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही. मात्र विरोधक खोक्याच्या बाबत चुकीची टीका करत आहेत. राजकीय क्रांती घडल्यामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते त्रस्त होऊन आमच्यावर टीका करत आहेत. ठाकरे गटातील आणखीन काही आमदार दसरा मेळाव्याच्या वेळी शिंदे गटात येण्याची शक्यताही शहाजी बापू पाटील यांनी वर्तवली.

विकासकामे सुरू आहेत

ठाकरे आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. महाविकास आघाडीची सत्ता असतानाची कामे झाली नाहीत. मुख्यमंत्री शिंदे असताना विकासकामे होत आहेत, असं ही त्यांनी सांगितलं.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.