
“प्रत्येक बिल्डींगमध्ये जाऊन पशू, प्राणीमात्रांसाठी जनजागृती करणार. आजपासून मी प्रत्येक टॉवर मध्ये जाणार आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गौरक्षक आहेत, तसे कबूतर रक्षक तयार करत आहोत. यामध्ये आता भाषावाद आला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरेच भाषावाद संपवू शकतात” असं जैन मुन्नी निलेशचंद्र म्हणाले. “कबूतर खाने कशामुळे बंद झाले, हे आजपर्यंत मराठी माणसाला देखील माहित नाही. मराठी जनता आहे, वोट बँकसाठी मराठी आणि मारवाडीला भ्रमित करणं सुरु आहे. जेवढा सन्मान तुम्ही मराठी भाषेचा करता, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही मारवाडी करतो. प्रत्येक फ्लॅटवर जय महाराष्ट्र, जय जिनेन्द्र असं कायम राहणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा फोटो देखील असणार” असं जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी सांगितलं.
“राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की, दोन तास तुम्ही कबुतरांना खाद्य टाकू शकता. पण दादरच्या कबूतर खान्यावर का नाही?. जोपर्यंत दादरच्या कबूतर खान्याला दोन तासाची खाद्य टाकण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ही जनजागृती सुरू राहणार” जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी सांगितलं. “राजस्थानी समाज जो राजस्थान प्रवासी समाज ते जे बाहेरून लोक आले आहेत, त्यांची तुलना आमच्याशी करू नका. महाराष्ट्रने आम्हाला दिलेलं आहे, तेवढं आम्ही महाराष्ट्राला पण दिलेलं आहे. आमचा जन्म जरी राजस्थान मध्ये झालाय पण आमची जी कर्मभूमी आहे, आई जरी राजस्थान असेल तरी आमची मोठी आई आहे महाराष्ट्र आहे” जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी आमच्या जैन समाजाशी बोलावं
“किती बांगलादेशी या ठिकाणी आलेत, त्यावर तुम्ही काय केलं?. जे फेरीवाले आहेत ते संपूर्ण बांगलादेशी आहेत. ही सुरुवातीला मोहीम यशवंत जाधव यांनी काढली होती आणि राज ठाकरे यांनी काढली. भोंग्यांची देखील मोहीम राज ठाकरे यांनी काढली होती. मराठी भाषेचा जो सन्मान आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर महाराष्ट्र प्रेम करणार कोण असेल तर राज ठाकरे” असं जैन मुन्नी निलेशचंद्र म्हणाले.”महाराष्ट्राची जनता राज ठाकरे यांचा सन्मान यासाठी करते कारण ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी स्वतः पुढाकार घेतात. राज ठाकरे यांनी आमच्या जैन समाजाशी बोलावं, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. पण तुम्ही म्हणाल की मारवाडीला थोबाडीत मारा आणि सांगतात की फोटो काढू नका. तुम्ही चालू करा मग आम्ही पण चालू करू. आम्ही आता सहन करणार नाही. आम्ही आता संघटित राहणार” असं जैन मुन्नी निलेशचंद्र म्हणाले.
त्यांना सांगणार की तुम बटोंगे तो पिटोंगे
“राजस्थानचे जे प्रवासी आहेत त्यांना सांगणार की तुम बटोंगे तो पिटोंगे. मोदींनी काय सांगितलं होतं बटोगे तो कटोगे. कुठल्याही मारवाडीला जर धक्का लागला, मुंबईचा राजस्थानी प्रवासी मारवाडीला जर मारत असेल तर जशास तसे उत्तर देणार. मराठीचा आणि भाषेचा वाद जर कोणी संपवू शकत असेल, तर फक्त राज ठाकरेच. बाकी कोणात्याच नेत्यात ताकत नाही” असं जैन मुन्नी निलेशचंद्र म्हणाले.