AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुमच्या मनगटात…, ‘जैन मुनींनी राज ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, वातावरण तापणार

राज ठाकरे यांनी पांढरी पट्टी वादात जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावर टीका केली होती. त्याला आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी उत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

'तुमच्या मनगटात..., 'जैन मुनींनी राज ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, वातावरण तापणार
| Updated on: Jun 20, 2026 | 8:34 PM
Share

मुंबईच्या दादर येथील एका सोसायटीत जैन धर्मगुरुंसाठी रस्त्यावर रंगवलेल्या पांढऱ्या पट्टीवरून मराठी आणि जैन असा वाद रंगला आहे. या प्रकरणात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्दा लावून धरला आहे.पांढरी पट्टीवरुन जैन मुनी निलेशचंद्र यांनी मराठी लोकांवर टीका केली होती. त्याला आत मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले होते. त्यावरुन आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा राज ठाकरे यांच्यावर टीका करुन त्यांना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.

दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात आता थेट वाकयुद्ध पेटले आहे. राज ठाकरे यांनी पांढऱ्या पट्टीचे अलिकडे आलेले फॅड पाहून त्यावर टीका केली होती. या तुमचे मुनीकडे सर्वत्र जातात, हायवे वरुन जातात. मगे तेथेही मारणार का पांढऱ्या पट्ट्या. जैन समाज असा नाही अलिकडील काही लोक भाजपाच्या नादी लागून असे वाद उकरुन काढत आहेत. कधी कबुतर तर कधी असे पांढरी पट्टीचे वाद काढून तुमच्या भांडणं लावून निवडणूक प्रक्रियेकडे तुमचे दुर्लक्ष व्हावे म्हणून वाद केले जात आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. कोण तरी तो मुनी कुरळी दाढीवाला फिरत असतो असे म्हणून राज ठाकरे यांनी जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावरही टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी, “हा वाद केवळ व्होट बँकेसाठी असून तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्र ओळखतो,” अशा शब्दांत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. स्वतःला कट्टर सनातनी असल्याचे सांगत जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले की “मंत्रालयात बसणारा राम आहे आणि त्याचा हनुमान ( नितेश राणे ) महाराष्ट्रात आहे. जे लोक भगव्याला हिरवं करण्याचा विचार ठेवतात, त्यांना सरळ करायला हनुमान समर्थ आहे,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच, माझ्या समाजाला जिथे गरज पडेल, तिथे मी लढायला तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माझे केस वाकडे की तिकडे…

“माझे केस वाकडे की तिकडे, हा माझा प्रश्न असून मी कुणाला उत्तर देण्यास बांधील नाही,” असे म्हणत त्यांनी वैयक्तिक टीकेला उत्तर देणे टाळले. जे मोदी आणि योगींचे विरोधक आहेत, तेच माझे विरोधक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादरमधील कबुतरांचा वाद राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी उकरून काढल्याचे ते म्हणाले.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद