जळगावमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे, ‘भाजपच्या एकला चलो’नंतर जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार

| Updated on: Oct 17, 2021 | 7:37 PM

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या खासदार रक्षा मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास आता नकार दिल्याने आता भाजप स्वतंत्र लढणार आहे. भाजपच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरूद्ध भाजप खासदार रक्षा खडसे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

जळगावमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे, भाजपच्या एकला चलोनंतर जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार
EKNATH KHADSE RAKSHA KHADSE
Follow us on

जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या खासदार रक्षा खडसे मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने भाजप स्वतंत्र लढणार आहे. भाजपच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरूद्ध भाजप खासदार रक्षा खडसे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे असा सामना 

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. तशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच दुकरीकडे काँग्रेसनेसुद्धा स्वबळाचा नारा दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

काँग्रेसचा भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार

याआधी अजिंठा विश्रामगृहावर 16 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी नेते तथा माजी आमदार सतीष पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत  काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता.  काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार

काँग्रेसने  एकला चलोचा नारा दिल्यामुळे भाजपने स्वबळाची तयारी केली आहे. भाजप सर्व 21 जागा लढवणार आहे. आजच्या  महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेतही विरोधकांना धक्कातंत्र देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

इतर बातम्या :

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका! माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!

‘देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे’, शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडमधून रणशिंग फुंकलं

‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था कराच’, परीक्षेच्या गोंधळावरुन भातखळकरांचा आरोग्यमंत्र्यांना टोला

(jalgaon district bank election bjp will contest independently election fight between eknath khadse and raksha khadse)