AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा आमच्याकडे येणारच, त्यानंतर मोठा गौप्यस्फोट करणार; गुलाबराव पाटलांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया

Gulabrao Patil on Ajit Pawar : अजित पवार, युती अन् मविआचं सरकार पाडण्यासाठीच्या बैठका; गुलाबराव पाटील यांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया

अजितदादा आमच्याकडे येणारच, त्यानंतर मोठा गौप्यस्फोट करणार;  गुलाबराव पाटलांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 02, 2023 | 11:38 AM
Share

विकास भदाणे,  जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नाराजी अन् युतीशी संभाव्य हात मिळवणी, यावर मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.अजित पवार युतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार युतीसोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

दादा येणारच!

अजितदादा पवार लवकरच आमच्याकडे येणार आहेत. दादा आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

अजित पवार यांचं कालचं वक्तव्य

काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं. काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 150 हून जास्त बैठका झाल्याचं म्हटलं होतं. त्याचा दाखला अजित पवार यांनी कालच्या भाषणात दिला. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी एवढ्या बैठका घेतल्या?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. त्याबाबत गुलाबराव पाटलांना विचारलं असता त्यांनी हा दावा केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केलाय. काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमच्याकडे येत आहेत. अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या, हे सांगू असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू अजित पवार!

सध्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार केंद्रस्थानी आहेत. अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांची प्रत्येक कृती अन् त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत असतात. काल अजित पवार यांना वज्रमूठ सभेत केलेल्या भाषणावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. गुलाबराव पाटलांनी अजित पवार सोबत येणार असल्याचा दावा केला आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला