AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराने जाहीर केलंय 25 लाखांचं बक्षीस, काय करावं लागणार? वाचा!

येत्या 18 डिसेंबर रोजी राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे.

भाजप आमदाराने जाहीर केलंय 25 लाखांचं बक्षीस, काय करावं लागणार? वाचा!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 15, 2022 | 2:11 PM
Share

संजय सरोदे, जालनाः मराठवाड्यातल्या एका भाजप आमदाराने (BJP MLA) कार्यकर्त्यांना मोठी ऑफर दिली आहे. राज्यात ग्राम पंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat Election) बिगुल वाजलाय. अशा वेळी माझ्या मतदारसंघातल्या ज्या ज्या ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक होईल, तिथे 25 लाख रुपयांचा विकास निधी बक्षीस म्हणून दिला जाईल, अशी घोषणा या आमदाराने केली आहे. भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांनी ही ऑफर दिली आहे. गावात शांततेने निवडणुका पार पाडाव्यात, सामंजस्य टिकून राहावे, अशी भावना असल्याचं नारायण कुचे यांनी सांगितलंय.

नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील अंबड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. या मतदारसंघाअतर्गत 28 ग्रामपंचायती येतात. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अंबड येथील गावांचा समावेश आहे.

येत्या 18 डिसेंबर रोजी राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. त्यासाठीची आचारसंहितादेखील लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र अंबडमधील सर्वच 28 ग्रामपंचायतींचा निकाल बिनविरोध लागला पाहिजे, असं वक्तव्य भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलं. नारायण कुचे यांनी अंबड तालुक्यात जेवढ्या ग्रामपंचायतील आहेत, त्यांना बोलावून गावाची परिस्थिती समजून घेतली. यावेळी दीपक भूयार, अवधूत नावा, भीमराव डोंगरे, जितुभाऊ पालकर आदी उपस्थित होते. आम्ही ग्रामपंचायतींचा आढावा घेतल्याचं नारायण कुचे म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, ज्या ज्या निवडणुका बिनविरोध होतील… तिथे 25 लाख रुपये विकासासाठी देणार. फक्त गावाने बिनविरोध निवडणूक झाली तर हे बक्षीस असेल. मागील ग्रामपंचायतींच्या वेळीही बिनविरोध निवडणुकांनंतर 21लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता, अशी माहिती नारायण कुचे यांनी दिली.

भाजप विकास आणि विचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...