VIDEO | हनुमंताला पाणी सोडून शपथ घ्या, जामनेरमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांचा फंडा, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 30, 2021 | 1:22 PM

मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विजयी सदस्यांना महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी हनुमंताजवळ शपथ घ्यायला लावल्याची चर्चा आहे. (Jamner Viral Video oath)

VIDEO | हनुमंताला पाणी सोडून शपथ घ्या, जामनेरमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांचा फंडा, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

जळगाव : जामनेरमधील महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी ग्रामपंचायत सदस्यांना हनुमंताला पाणी सोडून शपथ घ्यायला लावल्याचा व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. जळगावात भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात फोडाफोडी होण्याच्या भीतीने महाविकास आघाडीने सदस्यांना शपथ घ्यायला लावल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गिरीश महाजन यांना मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करता आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज रंगली आहे. (Jamner Viral Video Mahavikas Aghadi Pannel took oath from Gram Panchayat members)

ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य दुसऱ्या पॅनलमध्ये जाऊ नयेत, यासाठी हरतऱ्हेची खबरदारी घेतली जाते. कधी सदस्यांना सहलीवर नेले जाते, तर कधी रिसॉर्टमध्ये ठेवले जाते. मात्र जामनेरमध्ये अनोखा प्रकार घडल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये समोर आलं आहे.

“आमिषाला बळी पडणार नाही, एकनिष्ठ राहीन”

मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विजयी सदस्यांना महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी हनुमंताजवळ शपथ घ्यायला लावल्याची चर्चा आहे. मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, मी एकनिष्ठ राहीन, अशी हनुमंताला पाणी सोडून शपथ घ्यायला लावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

महाजनांचे मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीवर वर्चस्व

विशेष म्हणजे, गिरीश महाजन यांना मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करता आले. त्यामुळे हनुमंताला शपथ घ्यायला लावूनही महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य फुटल्याचं बोललं जातं. व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

काठावर बहुमत असलेल्या गावात फोडाफोडी

कोल्हापुरात काठावरील बहुमत असलेल्या गावात सदस्य फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. शिरोळच्या उदगाव मध्ये स्वाभिमानीचे सदस्य कलीमुन नदाफ महाविकास आघाडीच्या गोटात दाखल झाले आहेत.

उदगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला 8 तर स्वाभिमानीला मिळाल्या होत्या 9 जागा. आता नदाफ यांनी महाविकास आघाडीच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच वर्चस्व निर्माण झालं आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वाभिमानीकडून नदाफ यांचं मन वळवण्याचा प्रयत्न होतोय. (Jamner Viral Video Mahavikas Aghadi Pannel took oath from Gram Panchayat members)

सोलापुरात ग्रामपंचायत सदस्य सहलीला

दुसरीकडे सोलापुरातही सरपंचपदाची लॉटरी जाहीर होताच काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फोडाफोडीच्या राजकारण सुरुवात झाली आहे. करमाळा तालुक्यातील देवळाली, हिवरवाडी, मांगी, साडे, देवीचामाळ ग्रामपंचायतीत काठावर बहुमत आहे. त्यामुळे संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी अनेक सदस्य सहलीला गेले आहेत. तर अनेक ठिकाणी अपक्ष सदस्याला चांगलाच भाव चढलाय.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडलं तर 18 जानेवारीला निकालाचा गुलाल उधळला गेला. 27 जानेवारीला सोलापूर आणि कोल्हापुरात आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे संभाव्य सरपंचपदाच्या उमेदवारांनी पुढील तयारी सुरु केली आहे.

संबंधित बातम्या :

काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत सदस्यांची फोडाफोडी, सहलींना सुरुवात

नवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम, वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी अन् स्वच्छता मोहीम

(Jamner Viral Video Mahavikas Aghadi Pannel took oath from Gram Panchayat members)