“घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही, वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात”

| Updated on: Aug 27, 2021 | 4:20 PM

घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांना पाहिला. हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात, असा खोचक टोला राणे यांनी लगावला आहे. केस केल्यानं राणे घाबरणार असं वाटलं असेल पण मी घाबरणारा नाही, ते रक्तात नाही, असंही राणे यांनी म्हटलंय. राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली.

घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही, वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात
Follow us on

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक आणि सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांना पाहिला. हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात, असा खोचक टोला राणे यांनी लगावला आहे. केस केल्यानं राणे घाबरणार असं वाटलं असेल पण मी घाबरणारा नाही, ते रक्तात नाही, असंही राणे यांनी म्हटलंय. राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena)

सुशांतसिंह, दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन इशारा

सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला एकप्रकारे दम भरलाय. मी कुठलाही गुन्हा केला नाही. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला आहे. जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावलाय.

सभेची बंधन फक्त राणेंनाच का?

सभेची बंधनं फक्त नारायण राणेंनाच आहे का? आम्हाला मनाई का? कोरोनाची लाट होती तेव्हा कारवाई झाली नाही? आता संपल्यावर कारवाई होतेय. त्यांना विरोध करू दे ही सत्तेची मस्ती आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दरोडे पडत आहेत. खून मारामारी विचारू नका. सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. असे अनेक प्रकरणं आहेत. त्याचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाही, असं ते म्हणाले.

राणेंच्या नादी लागू नका

राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय. नाही तर सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. केसेस काढू हे काढू. अरे मी एवढाच क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? पहिली पदं तुम्हीच दिली ना तेव्हा विरोध का केला नाही? 39 वर्षात शिवसेनेसाठी जे काही केलं… साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही, नारायण राणेंचा रोखठोक इशारा

बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena