AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही, नारायण राणेंचा रोखठोक इशारा

युवासेना (Yuva Sena) सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला.

वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही, नारायण राणेंचा रोखठोक इशारा
Narayan Rane_Varun Sardesai
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 1:38 PM
Share

रत्नागिरी : युवासेना (Yuva Sena) सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला. ते रत्नागिरीत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत (BJP Jan Ashirwad Yatra) बोलत होते. नारायण राणेंच्या अटक नाट्याच्या तिसऱ्या दिवशी भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघाली. आज राणे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप करणार आहेत.

दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला. वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं.

वरुण परत जाणार नाही

त्याबाबत नारायण राणे म्हणाले, “आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढी त्याला आहे. त्याने मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या मुलांनी एव्हढा चोपला ना.. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच”, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

आपल्या पक्षाला खासदार आणि विधानसभेत राज्य येण्यासाठी आमदार पाठवणं गरजेच आहे, शिवसेना औषधालाही उरली नसली पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.

वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात आंदोलन 

युवासेनेने दोन दिवसापूर्वी वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात नारायण राणेंच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले.  भाजपचे कार्यकर्ते आमच्यावर दगडफेक करत आहेत. मात्र, पोलीस आमच्यावर लाठीमार करत आहेत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक काय हजार लाठ्या खाऊ. भाजपच्या बांडगुळांना पळवून लावू, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले.

VIDEO : नारायण राणे यांचं संपूर्ण भाषण

संबंधित बातम्या    

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं ओपन चॅलेंज

राणेंच्या घराबाहेर जाऊन ताकद दाखवली, आधी उद्धव ठाकरेंकडून शाबासकी, आता आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.