राणेंच्या घराबाहेर जाऊन ताकद दाखवली, आधी उद्धव ठाकरेंकडून शाबासकी, आता आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2021 | 11:40 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर राडा करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून बक्षीस मिळालंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राणेंच्या घराबाहेर जाऊन ताकद दाखवली, आधी उद्धव ठाकरेंकडून शाबासकी, आता आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस
आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Follow us on

मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर राडा करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून बक्षीस मिळालंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मोहसीन यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.

आदित्य ठाकरेंकडून बक्षीस

मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारले होते. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झालीय. जी पाहून अनेकजण हळहळले होते. राणे-सेना आंदोलावेळी राणे समर्थकांशी पंगा घेतल्यानेच शेख याची युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आदित्य ठाकरे यांनी मोहसीन शेख यांची सहसचिवपदी नियुक्ती केली. पण बी नियुक्ती तात्पुरत्या स्वुरुपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून कायम करण्यात येईल, असं युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मोहसनीच्या पाठीवर कौतुकाची थाप

नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत चांगलाच राडा घातला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली. यात मोहसीन आघाडीवर होता.

दरम्यान, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.’

कोण आहे मोहसीन शेख?

मोहसीन शेख यांनी राष्ट्रवादीतून 2017 ला शिवसेनेत प्रवेश केलाय.

मोहसीन शेख यांची पत्नी राष्ट्रवादीची मानकूर शिवाजीनगरची नगरसेविका आहे.

युवासेनेच्या जनसंवाद यात्रेतही मोहसीन शेख सहभागी होता.

नारायण राणे समर्थक बरोबर झालेल्या राडयात मोहसीन पुढे होता.

या राड्यात पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये जखमी झाल्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे ही वाचा :

शाब्बास पठ्ठ्यांनो! राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI