‘छगन भुजबळ हे आधुनिक युगाचे भगीरथ’, जयंत पाटलांचे गौरवोद्गार

| Updated on: Oct 01, 2021 | 5:04 PM

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळसाहेबांच्या पाठपुराव्याने. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी छगन भुजबळांबाबत गौरवोद्गार काढले आहेत.

छगन भुजबळ हे आधुनिक युगाचे भगीरथ, जयंत पाटलांचे गौरवोद्गार
जयंत पाटील, छगन भुजबळ
Follow us on

नाशिक : ‘छगन भुजबळसाहेब अफाट काम करत आहे. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. हे कधी शक्य होईल जेव्हा आपले संघटन मजबूत असेल. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळसाहेबांच्या पाठपुराव्याने. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी छगन भुजबळांबाबत गौरवोद्गार काढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा नवव्या दिवशी नाशिक जिल्हयात दाखल झाली आहे. त्यावेळी पाटील बोलत होते. (Jayant Patil praises Chhagan Bhujbal in NCP Pariwar Sanwad yatra )

भुजबळसाहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजपसरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीरसिंग देश सोडून पळून गेले आहेत त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा, असा सवालही पाटील यांनी यावेळी केलाय. लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होते आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

‘भुजबळांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश’

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळसाहेबांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आल्याचं पाटील म्हणाले. मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे, असं आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिलं.

‘केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरा’

भुजबळसाहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. आपले फक्त 54 आमदार आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी आलेल्या अभिप्रायचे वाचन जयंत पाटील यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील येवला – लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी यावेळी घेतला.

फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण!

अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील शेती पिकांचं आणि जमिनीचं प्रचंड नुकसान झालंय. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील या पूरस्थितीला काही पर्यावरण तज्ज्ञांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेकडे बोट दाखवलं आहे. मात्र, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केलीय. जलयुक्त शिवारमधील काही कामं चांगली झाली आहेत. सर्वच कामं खराब नाहीत. जलयुक्त शिवारमुळे फायदे आणि तोटेही झाले आहेत, असं पाटील म्हणाले. तसंच तज्ज्ञांच्या मतावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे.

इतर बातम्या :

जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं

‘मंत्री टीव्हीवर घोषणा करतात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खडकू मिळत नाही’, फडणवीसांचा घणाघात

Jayant Patil praises Chhagan Bhujbal in NCP Pariwar Sanwad yatra