‘शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले’, जितेंद्र आव्हांडांचा गणेश नाईकांवर पलटवार

आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे (Jitendra Awhad slams Ganesh Naik).

'शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले', जितेंद्र आव्हांडांचा गणेश नाईकांवर पलटवार
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 6:15 PM

मुंबई :शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले. त्यांनी 1977 साली पक्ष काढला आणि 1999 सालीदेखील पक्ष काढला. त्यांनी पक्ष काढल्यानंतर तुमच्यासारखी 60 ते 70 आमदार निवडून आले होते. याला बाप बदलणं नाही तर बाप होणं म्हणतात. ते बाप झाले म्हणूच त्यांनी माझ्यासारख्या गरिबाच्या मुलाला इथपर्यंत आणलं. तुम्ही बाप बदलत गेलात”, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad slams Ganesh Naik) केला. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे (Jitendra Awhad slams Ganesh Naik).

हेही वाचा : पवारांनी तीनवेळा पक्ष बदलला, त्यांचाही बाप काढणार का? नाईकांचा आव्हाडांना सवाल

गणेश नाईक यांनी आज जितेंद्र आव्हाड यांना “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील तीन वेळा पक्ष बदलला आहे. मग शरद पवारांचीदेखील गणणा तुम्ही बाप बदलणाऱ्यांच्या औलादीमध्ये करणार आहात का?”, असा सवाल विचारला होता. त्यांच्या याच प्रश्नाला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत त्यातून प्रत्युत्तर दिलं आहे.

नाईक विरुद्ध आव्हाड, नेमकं काय झालं? वाचा : “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“गणेश नाईक कृतघ्न आहेत, असं मी म्हणत होतो. मात्र हे विधान सत्य असल्याचे त्यांच्या आजच्या वक्तव्यावतून समोर आलं आहे. त्यांनी आपल्या त्या वक्तव्यातूनच स्वत:वर तसा शिक्का मारुन घेतला आहे. त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतलं. शरद पवार यांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहिती आहे? ते मला माहिती नाही. मात्र, आज तुम्ही तुमच्या विधानातून दाखवून दिलं की, तुम्ही कृतघ्न आहात. हे मला नवी मुंबईकरांना दाखवायचं होतं. मी पुराव्यानिशी दाखवून देतोय”, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

“तुम्ही कधी आगरी समाजापाची घरे पडत असताना गेला नाहीत. मी आगरी समाजाची घरे पडत असताना गेलो. जेव्हा आगरी समाजावर संकंट आलं तेव्हा तुम्ही कायद्याची चौकट दाखवत निघून गेलात”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“आज जेवढ्या अडचणींना नवी मुंबई सामोरे जात आहे, त्या अडचणींवर तुम्ही कधीही भाष्य केलं नाही. पण आपला राजकीय हेतू साध्य व्हावा यासाठी तुम्ही आपल्या मुलाचा बळी दिला. तेव्हा समाजाचं काय? नाईक साहेब बोलण्यासारखं खूप आहे. मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की, तुम्ही कृतघ्न आहात. तुमच्यावरती केलेल्या उपकारांची तुम्हाला कधीही जाणीव नसते. मग ते उपकार आगरी समाजाचे असोत किंवा शरद पवारांचे किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे असोत, तुम्ही आज तुमच्यातला अंतरंग बाहेर काढून दाखवला”, असा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी काढला.

“बाप काढल्याचं वक्तव्य तुम्ही केलं. मी बाप काढला नाही. कुठल्यातरी फडतूस पिक्चरचा फडतूस डायलॉग बोलून तुम्ही बाप काढलात. तेव्हा मी खाली घसरलो की तुम्ही खाली घसरलात? हे जरा आठवून बघा”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

संबंधित बातम्या : 

मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, आव्हाडांची गणेश नाईकांवर बोचरी टीका

मी राष्ट्रवादी सोडण्याचं कारण पवारांना माहित, त्यांनी सुनावलं तर गप्प बसेन : गणेश नाईक 

पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत : छगन भुजबळ

कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार

मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…

नवी मुंबईत आता त्यांची ताकद राहिली नाही, रोहित पवारांचा गणेश नाईकांना टोला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.