निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात मोठा पुरावा सादर, शिंदेंचे टेन्शन वाढले? थेट कपिल सिब्बल यांनी प्रत..
शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुद्द्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद केला जात आहे. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. थेट अध्यक्षांवरची मोठे खापर फोडण्यात आलंय.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात आताही सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटले की, पक्षात संविधानानुसार निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. सिब्बल यांनी कोर्टात निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली करून कशा पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनाला मान्यता दिली, याबाबत युक्तिवाद झाला. कपिल सिब्बल यांच्याकडून जनता दलाच्या फुटीचा दाखल दिला जात आहे. संघटनात्मक रचनेनुसार, घटना चुकीची ठरू शकत नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले. यादरम्यान निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप करतान कपिल सिब्बल दिसत आहेत. आमदार अपात्रतेबद्दलची त्यांनी जोरदार युक्तीवाद केला. पक्षाचे निर्देशने पाळा असे आयोग सांगू शकला असता.
यादरम्यानच कोर्टात कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली प्रत दाखवण्यात आली. या आयोगाविरोधात मोठा पुरावा असल्याचे म्हटले जातंय. यासोबतच कालच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी आपल्याकडे असलेली कागदपत्रे कोर्टाला घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी आज कोर्टात आयोगाची प्रत दाखवली.
2023 मधील अध्यक्षांनी आमदारांना नोटीस दिल्याचेही कोर्टात सांगण्यात आले. आमच्या प्रकरणात अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवल्याचे कोर्टात सांगण्यात आले. अडचण असेल तर आयोग सूचना देऊ शकले असते. या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून सतत आयोगावर आरोप आणि प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहेत. पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती.
अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घेतला नाही म्हणत अध्यक्षांवर कपिल सिब्बल यांनी खापर फोडले. नोटीसला शिंदेंच्या आमदारांनी उत्तर दिले. पण पुढे काय झाले? असाही मोठा प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात उपस्थित करण्यात आला. दोन्ही मुद्दे अध्यक्ष पाहू शकत नसल्याचेही कपिल सिब्बल यांनी म्हटले. जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात केला जात आहे. ज्या घटना घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली, हे स्पष्ट असल्याचेही कपिल सिब्बल यांनी सांगितले.
