AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराचा मुलगा 40 लाखाची लाच घेताना ताब्यात; कार्यालयातूनही कोट्यवधी रुपये जप्त…

आमदाराचा मुलगा लाच घेत असल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणी लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमुळेच लोकायुक्तांनी सापळा रचून प्रशांतला रंगेहाथ पकडले आहे.

भाजप आमदाराचा मुलगा 40 लाखाची लाच घेताना ताब्यात; कार्यालयातूनही कोट्यवधी रुपये जप्त...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 03, 2023 | 1:00 AM
Share

बंगळूरुः लोकायुक्त पोलीस आणि कर्नाटक सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भाजपच्या विद्यमान आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई करण्यात आली त्यावेळी आमदाराचा मुलगा एका खासगी कार्यालयात बसला होता. त्यानंतर त्याला 40 लाखांची लाच घेताना लोकायुक्तांकडून पकडण्यात आले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मादाल याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आमदार मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटकमधील सोप्स आणि डिटर्जंट्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा प्रशांतच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.

आमदाराचा मुलगा लाच घेत असल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणी लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमुळेच लोकायुक्तांनी सापळा रचून प्रशांतला रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली केली. यावेळी प्रशांतकडून 40 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणाची माहिती देताना लोकायुक्त अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही प्रशांतच्या कार्यालयाची तपासणी केली आहे. आणि तिथून 1.7 कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.

प्रशांत आणि त्याच्या वडिलांच्या नावाने लोकांकडून लाच घेत असल्याचा आरोपही त्याच्यावर केला गेला आहे. त्यांच्या कार्यालयात सापडलेल्या पैशांची सध्या चौकशी सुरु असून या प्रकरणाती आणखी कोण कोण आहेत त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.

भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. ही गोष्ट मला टीव्हीवरच्या बातम्या बघूनच समजली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बरखास्त करून लोकायुक्तांचे अधिकार प्रदान केले आहेत.

लोकायुक्त हे सरकार किंवा प्रशासनाच्या कार्यक्षमता आणि परिणामकारकतेविरुद्धच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी राज्य स्तरावर स्थापन केलेले भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरण आहे. त्यानुसार तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ कारवाई केली जात आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?