KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी मतदान, काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध शिवसेना खासदारांचं पॅनेल आमने-सामने

| Updated on: Jan 05, 2022 | 8:22 AM

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साठी आज मतदान होत आहे. 12 ठिकाणी 40 टेबलवर पार मतदान प्रक्रिया पडणार आहे. जिल्हा बँकेच्या 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत.

KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी मतदान, काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध शिवसेना खासदारांचं पॅनेल आमने-सामने
हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संजय मंडलिक
Follow us on

कोल्हापूर: राज्यात सत्तेत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ( KDCC Bank Election) निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी, (NCP) भाजप (BJP) ताराराणी आघाडीच्यावतीनं पॅनेल उभ करण्यात आलं. तर, शिवसेनेनं (Shivsena) देखील शेकापच्या साथीनं पॅनेल उभं केलंय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज 15 जागांसाठी मतदान होत आहे. तर, 6 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.

मतदान प्रक्रिया कशी असणार?

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साठी आज मतदान होत आहे. 12 ठिकाणी 40 टेबलवर पार मतदान प्रक्रिया पडणार आहे. जिल्हा बँकेच्या 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सात हजार 661 मतदार मतदानाचा हक्क आहेत. करवीर तालुका आणि कोल्हापूर शहरची मतदान प्रक्रिया प्रतिभा नगर मधील वि स खांडेकर विद्यालयात पार पडणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात होणार आहे.

दोन मंत्री विरुद्ध खासदार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी असा सामना होतोय.

6 जागा बिनविरोध

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

भाजपला सोबत घेतल्यानं शिवसेनेचं स्वतंत्र पॅनेल?

काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनाला केवळ एका जागेसाठी बाजूला ठेवत भाजपशी जवळीक केली.यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने आरपीआय आणि शेकापला जवळ करत सर्व जागांवर पॅनल जाहीर केलं होतं. जिल्हा बँक बिनविरोध होण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या.मात्र यामध्ये शिवसेनेने तीन जागांची केलेली मागणी पूर्ण करण्यात मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ याना यश आले नाही.उलट भाजपला त्यांनी दोन जागा देऊ केल्या त्यामुळे शिवसेनेने अखेर सर्वच जागा लढण्याचा निर्धार करत पॅनल जाहीर केल्याचं शिवसेना संपर्क नेते अरुण दुधवडकर म्हणाले होते. तर, शिवसेनेने आमचा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होते.

इतर बातम्या:

‘ई-गोपाल’ च्या माध्यमातून पशूपालकांना योजनांचा लाभही अन् अडचणीवर मातही, वाचा सविस्तर

Bank | देशातील पहिली थेट पेमेंट बँक, अर्थजगतात एन्ट्री करणाऱ्या नव्या बँकेचं नाव आहे ‘एअरटेल पेमेंट’

 

KDCC bank Election Kolhapur District Cooperative bank Election voting today Shivsena contest against NCP Congress BJP Panel