Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांना भरला दम

Devendra Fadnavis : धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला. त्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांना भरला  दम
Devendra Fadnavis
Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 05, 2025 | 11:22 AM

काल धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या अडीच महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. कारण या हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याच समोर आलं. तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराडमुळेच आधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. तोच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामागचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप झाला होता. पण मागच्या आठवड्यात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल झालं. त्यातून ही बाब समोर आली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळचे फोटो समोर आले.

त्यातून अत्यंत अमानुषता दिसून आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्साठी प्रकृतीच कारण दिलय. दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांना दम भरला आहे. “चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील” अशा इशाराच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला आहे. भाजपाच्या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी सागर निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दम भरला. त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोल ही सुनावले.

‘भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा’

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच बैठक झाली. त्याचं दिवशी या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले. “तुम्ही जनतेचे मंत्री आहात आणि भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा. लोकहिताची काम आणि चांगल्या योजना शासनासाठी सुचवा” अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना केल्या आहेत. “लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा. मोबाईलवर बोलताना तारतम्य ठेवा. चुकीचे वर्तन मंत्रीपदावर गंभीर परिणाम करेल” असा मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.