किरीट सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत, कार्यकर्तांच्या खांद्यावर बसून संजय राऊतांवर गंभीर आरोप

| Updated on: Sep 20, 2021 | 6:04 PM

मुंबईत येताच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणारे सोमय्या यांनी आपली तोफ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर 55 लाख रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

किरीट सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत, कार्यकर्तांच्या खांद्यावर बसून संजय राऊतांवर गंभीर आरोप
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us on

मुंबई : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास मनाई केल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत. मुंबईत परतताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलत सोमय्या यांचा जयजयकार केला. मुंबईत येताच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणारे सोमय्या यांनी आपली तोफ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवली. त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर 55 लाख रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. (kirit somaiya alleges that sanjay raut taken 55 lakh rupees of bmc bank depositors)

संजय राऊत यांनी 55 लाख रुपये ढापले 

मुंबईत येताच किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूर जिल्हाबंदी तसेच महाविकास आघाडी सरकारचे कथित घोटळे यांच्यावर भाष्य केले. तसेच पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले. “शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यासोबत जे झाले, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे भाष्य केले. हे तेच आहेत ज्यांनी बीएमएसी बँकेच्या डीपॉझिटरचे 55 लाख रुपये ढापले होते. हाच चोरीचा माल त्यांना परत करावा लागला होता,” असे विधान सोमय्या यांनी केले. म्हणजेच संजय राऊत यांनी बिएमसी बँकेमध्ये 55 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता असा अप्रत्यक्ष आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

उद्धव ठाकरेंचा घोटाळा, 19 बंगल्यांची पाहणी करणार

तसेच पुढे बोलताना त्यांनी मी येत्या सोमवारी अलिबागला जाणार आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने 19 बंगल्याचा घोटाळा केला आहे. याच बंगल्यांची मी अलिबागला जाऊन पाहणी करणार आहे. तसेच येत्या गुरुवारी मी अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहे. पारणेरमध्ये साखर कारन्यामध्ये जो घोटाळा झाला आहे, त्याचीही पाहणी करणार आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.

पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न

पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. मुश्रीफ घोटाळेबाज असून त्यांना मुख्यंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यंत्री अजित पवार पाठीशी घालत आहेत, असा आरोप त्यांनी केला. “मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरु आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मी आता थांबणार नाही. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागणार, असंही सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या :

किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या फैरी, अजित पवारांनी एका वाक्यात निकाल लावला!

राज्यसभेचा उमेदवार जाहीर करुन भाजपनं प्रथा मोडली?, थोरातांनी महाजनांची आठवण करून दिली, काँग्रेस भाजपला विनंती करणार?

Rajya Sabha : राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा

(kirit somaiya alleges that sanjay raut taken 55 lakh rupees of bmc bank depositors)