Sanjay Raut : सोमय्या 140 कोटी जमा करून राजभवनात देणार होते, 58 कोटीच जमवता आले, संजय राऊतांचा सोमय्यांना चिमटा

| Updated on: Apr 12, 2022 | 12:02 AM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना चिमटा काढला आहे. संजय राऊतांनी ट्विट करुन आपल्या अनोख्या अंदाजात सोमय्यांना लक्ष्य केलंय.

Sanjay Raut : सोमय्या 140 कोटी जमा करून राजभवनात देणार होते, 58 कोटीच जमवता आले, संजय राऊतांचा सोमय्यांना चिमटा
संजय राऊत, शिवसेना नेते
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना चिमटा काढला आहे. संजय राऊतांनी ट्विट करुन आपल्या अनोख्या अंदाजात सोमय्यांना लक्ष्य केलंय. सध्या राज्यात आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरण चांगलंच गाजतंय. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) पुन्हा आमनेसामने आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी समन्स बजावल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यावरून सोमय्यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. आधी संजय राऊतांनी सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतात, अशी शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांची तुलना नीरव मोदीशी केली. आता पुन्हा राऊतांनी ट्विट करत सोमय्यांना लक्ष्य केलं होतं. यावेळी त्यांनी सोमय्यांवर टीका करताना राजभवनाचाही उल्लेख केला आहे.

संजय राऊतांचा सोमय्यांना चिमटा

शिवसेना नेते संजय राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘ किरीट सोमय्या 140 कोटी रुपये जमा करून राजभवनात देणार होते. त्यांना 58 कोटी जमवता आले. Ins vikrant 60 कोटी ना भंगारात गेली. 58 कोटीचा हिशेब लागत नाही. जे सोमय्या बाप बेट्याने जमा केले. हिशोब तर द्यावाच लागेल. 58 कोटी हडप केले नसते तर विक्रांत वाचवता आली असती. जय महाराष्ट्र!’ अशी टीका संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊतांचे ट्विट

भाग सोमय्या भाग चित्रपट काढा

यापूर्वी संजय राऊतांनी काश्मीर फाईल चित्रपटाचा आधार घेत भाजपला टोला लगावला आहे. सोमय्या गायब आहेत, याबाबत राऊतांना विचारले असता राऊत म्हणाले, काय असणार प्रतिक्रिया, भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांचा समाचार घेतला आहे. जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणता, घाबरत नाही म्हणता, इतरांना त्याच्या भ्रष्टाचारावरून प्रश्न विचारता, कायद्याला कोर्टाला सामोरे जा म्हणता मग तुम्ही का पळता? असा थेट सवाल राऊतांनी केला होता.

इतर बातम्या

SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?

Washim Accident : वाशिम अनियंत्रित कार झाडावर आदळली, अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी

पत्नीवर नजर पडू नये म्हणून घरात डांबलं, पीडित पत्नीची सुटका