पंतप्रधान मोदी प्रचारसभेत लोकांना दाखवत असलेले ‘हे’ आभूषण काय आहे?

पंतप्रधान मोदी प्रचारसभेत लोकांना दाखवत असलेले 'हे' आभूषण काय आहे?


इटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अरुणाचल प्रदेशमधील पासीघाट येथे लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांना आपल्या गळ्यातील निळ्या रंगाचे नेकलेससारखे आभूषण दाखवून संवाद साधला. मात्र, हे आभूषण नेमके काय आहे? याविषयी अनेकांना उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक आदिवासी जमातीचे नागरिक राहतात. या सर्वांच्या राहणीमान, परंपरा, संस्कृती, भाषा आणि वेशभूषांमध्ये कमालीचे अंतर आहे. यात एक ‘आदी’ जमातही आहे. आदी जमातीचे लोक आपली स्वतंत्र वेशभूषा घालतात. मोदींनी घातलेले ते आभूषणही याच आदी जमातीचे आहे. अरुणाचल आणि आसाममधील आदी जमातीचे लोक अशाच प्रकारचे हार परिधान करतात. हे हार अनेक रंगांमध्ये असतात. या हारांना ‘अरुलया’ नावानेही ओळखले जाते. या अरुलया हारात 36-60 मोती असतात. अशाच प्रकारचे आणखी एक नेकलेस आहे त्याला ‘लेकापों’ नावाने ओळखले जाते. हे हार ‘इदु मिश्मी’ (इदु ल्होबा) जमातीचे लोक घालतात. अरुणाचल प्रदेशमधील या जमातींची आभूषणे अनेकदा एकसारखीच दिसतात. असे असले तरी जमातीनुसार या आभूषणांमध्ये सूक्ष्म वेगळेपण असते.

दरम्यान, मोदी म्हणाले होते, ‘यावेळी निवडणूक तुमचा सांस्कृतिक वारसा, परंपरा, गौरवाचे रक्षण करणारे आणि या तुमची आभूषणे, परंपरा यांची चेष्टा, अपमान करणाऱ्यांमध्ये होणार आहे.’ याद्वारे मोदींनी निवडणुकीचा अजेंडा परंपरावाद आणि अस्मितांवर नेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे विरोधक या निवडणुकीचा अजेंडा नोकऱ्या, शेतीची दुरावस्था आणि भ्रष्टाचार असावा यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ:

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI