उपमहापौर ते थेट मंत्री; ‘जायटं किलर’ विद्या ठाकूर यांचा पॉलिटिकल ग्राफ वाचा!

| Updated on: Aug 10, 2021 | 9:52 AM

माजी मंत्री विद्या ठाकूर या भाजपच्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्या आहेत. ठाकूर यांच्या सासरची आणि माहेरची मंडळी जनसंघापासूनच राजकारणात सक्रिय आहे. (know maharashtra ex minister vidya thakur's political graph)

उपमहापौर ते थेट मंत्री; जायटं किलर विद्या ठाकूर यांचा पॉलिटिकल ग्राफ वाचा!
Vidya Thakur
Follow us on

मुंबई: माजी मंत्री विद्या ठाकूर या भाजपच्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्या आहेत. ठाकूर यांच्या सासरची आणि माहेरची मंडळी जनसंघापासूनच राजकारणात सक्रिय आहे. शिवाय मुंबईतील उत्तर भारतीय व्होट बँकेवर विद्या ठाकूर यांची चांगली पकड आहे. त्यामुळेही भाजपमध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्या ठाकूर या राजकारणात कशा आल्या? त्यांचं राजकारण कसं राहिलं आहे? यावर टाकलेला हा प्रकाश. (know maharashtra ex minister vidya thakur’s political graph)

माजी मंत्री आणि आमदार विद्या ठाकूर या वाराणसीच्या पिंडरा क्षेत्रातील मानी गावच्या सून आहेत. त्यांचा जन्म जंसा कुंडरिया इथला. 2014मध्ये त्या पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या. गोरेगाव विधानसभेतून त्या विजयी झाल्या. थेट शिवसेना नेते सुभाएष देसाईंना पराभूत करून त्या विधानसभेत पोहोचल्या. त्यामुळे विद्या ठाकूर एकदमच चर्चेत आल्या. एवढेच नव्हे तर तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची लॉटरीही लागली. फडणवीस सरकारमध्ये त्या महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचीही जबाबदारी देण्यात आली होती.

घरातच राजकारण

विशेष म्हणजे विद्या ठाकूर यांच्या घरातच राजकारण होतं. त्यांचे वडील प्रभू शंकर शर्मा हे जनसंघाच्या तिकीटावर मुंबईतून निवडणूक लढले होते. त्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. विद्या ठाकूर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील असला तरी त्यांचं बालपण मुंबईतच गेलं. शिक्षणही मुंबईतच झालं. कुडीलाल गोविंदराम सकसेरिया सर्वोदय शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं होतं.

कुटुंब राजकारणात

जयप्रकाश सिंह ठाकूर हे त्यांचे पती. जयप्रकाश सिंह ठाकूर हे उत्तर प्रदेशातील जनसंघाचे अध्यक्ष चंद्रबली सिंह यांचे चिरंजीव आहेत. स्वत: जयप्रकाश सिंह ठाकूर राजकारणात सक्रिय असून ते मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी अनेकवेळा निवडणूक लढवली. पण त्यांना यश आलं नाही. या उलट विद्या ठाकूर या नगरसेविका होत्या. तसेच त्यांनी मुंबईच्या उपमहापौर म्हणूनही काम पाहिलं आहे. त्या 1992मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. विशेष म्हणजे विद्या ठाकूर यांचे भाऊ राजेश शर्मा हे सुद्धा मुंबईचे माजी उपमहापौर राहिले आहेत. राजेश शर्मा यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना विजय मिळू शकला नाही.

विकास कामे

विद्या ठाकूर यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली आहेत. गोरेगावातील सिद्धार्थ रुग्णालयाची पुनर्बांधणी, प्रसुतीगृहाचे बांधकाम आणि उड्डाण पुलाचं काम त्यांनी मार्गी लावलं. तर लिंक रोडपासून ते सिद्धार्थ नगरपर्यंतच्या पट्टयात आजही पावसाचे पाणी तुंबते. खाड्यांवरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आदी काही प्रश्न त्यांच्या मतदारसंघात आजही तसेच आहेत.

भूषविलेली पदे

भाजप महिला मोर्चाच्या माजी सेक्रेटरी
मुंबई पालिकेत नगरसेविका
पालिकेतील आरोग्य समितीच्या माजी अध्यक्षा
मुंबईच्या माजी उपमहापौर (2007)
आमदार (know maharashtra ex minister vidya thakur’s political graph)

 

संबंधित बातम्या:

‘पॉवरफुल्ल’ महिला राजकारणी, तीनवेळा आमदार, पण मंत्रीपद नाही; जाणून घ्या प्रणिती शिंदेंची राजकीय कारकिर्द

राजकारणात प्रवेश कसा झाला?, आदिती तटकरेंनी सांगितलं गुपित; वाचा राजकीय प्रवासाची चित्तरकथा!

वयापेक्षाही जास्त संपत्ती असलेला युवा नेता; जाणून घ्या कोण आहेत ऋतुराज पाटील?

(know maharashtra ex minister vidya thakur’s political graph)