AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

ऋतुराज पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 21, 2020 | 7:44 AM
Share

कोल्हापूर : जिल्ह्यातील आणखी एका बड्या राजकीय घरात कोरोनाचा शिरकाव झाला. कोल्हापूरमधील काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil tested positive for Corona)

ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे विधानसभा आमदार आहेत. ऋतुराज यांनी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला.

ऋतुराज पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.

“माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.” असे ट्वीट ऋतुराज पाटील यांनी केले.

कोल्हापुरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही ‘कोविड योद्धा’ म्हणून जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी चारच दिवसांपूर्वी केलं होतं. “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” असा व्हिडीओ शेअर करत ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केलं आहे. “त्याला काय हुतंय?” हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil tested positive for Corona)

ऋतुराज पाटील यांचा परिचय

ऋतुराज पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघाचे विधानसभा आमदार आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या ऋतुराज पाटील यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार अमल महाडिक यांचा तब्बल 40 हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.

ऋतुराज पाटील यांना समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. ऋतुराज हे शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे चिरंजीव. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ते पुतणे आहेत. सतेज पाटलांनी गेल्या वर्षी धडाक्यात आपल्या पुतण्याचे लाँचिंग केले होते.

आमदारपदी वर्णी लागल्यापासून ऋतुराज पाटील कोल्हापुरात वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसतात. कोल्हापुरातील युवक वर्गात त्यांचा दांडगा संपर्क आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी ऋतुराज पाटील यांची निवड झाली आहे.

संबंधित बातम्या :

युवा आमदार ऋतुराज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी

“हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” ऋतुराज पाटील यांच्या कानपिचक्या

(Kolhapur Congress MLA Ruturaj Patil tested positive for Corona)

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर