AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर शिंदे गटाला शिवसेनेचा धनुष्यबाण मिळणार नाही; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचा खूप मोठा दावा

धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी खूप मोठा दावा केला आहे.

...तर शिंदे गटाला शिवसेनेचा धनुष्यबाण मिळणार नाही; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचा खूप मोठा दावा
| Updated on: Oct 03, 2022 | 7:30 PM
Share

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातुन राज्यात सत्तांतरानंतर पाहिलीच निवडणुक होत आहे. या निवडणुकीच्या माध्यामातून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटात लढाई सुरु आहे. निवडणुक आयोग यावर निर्णय देणार आहे. धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत कायदेतज्ञ उज्वल निकम(Ujwal Nikam) यांनी खूप मोठा दावा केला आहे.

अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. तर, अंधेरी विधानसभेची जागा भाजप लढवणार आहे. शिंदे – फडणवीस यांच्यातील बैठकीत पोटनिवडणूकीमध्ये भाजप आपला उमेद्वार उतरवणार असल्याची चर्चा आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शिंदे गटाने उमेदवार दिला नाही तर उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळू शकते अशी शक्यता कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी वर्तवली आहे.

शिंदे गटाने या पोट निवडणुकीत आपला उमेदवार दिला तर मात्र निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण होऊ शकतो असेही उज्वल निकम. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला तर आयोग चिन्ह गोठवू शकते. निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या आत चिन्हासंदर्भात निर्णय घेणे बंधनकारक असल्याचेही उज्वल निकम म्हणाले.

निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा ? पुढची लढाई कोण जिंकणार? या सगळ्याचा निर्णय आता निवडणुक आयोगच देणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना दोन गटात विभागली आहे.

मागाठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली
मागाठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली.
निवडणुकीत पैशांचा धमाकुळ सुरु! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
निवडणुकीत पैशांचा धमाकुळ सुरु! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप.
असं कधीच घडलं नव्हतं... आकाशातून आले जळते दगड... भंडाऱ्यात एकच खळबळ
असं कधीच घडलं नव्हतं... आकाशातून आले जळते दगड... भंडाऱ्यात एकच खळबळ.
... तर एकही विमानतळ अदानींनी बांधलं नाही! राज ठाकरेंचा मोठा खुलासा
... तर एकही विमानतळ अदानींनी बांधलं नाही! राज ठाकरेंचा मोठा खुलासा.
ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग!
ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग!.
पुण्यात फडणवीस-राज ठाकरे आमने-सामने
पुण्यात फडणवीस-राज ठाकरे आमने-सामने.
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नितेश राणेंचा रोड शो!
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नितेश राणेंचा रोड शो!.
हा दहशतवाद संपवायचाय! अशोक चव्हाण यांची एसआयटी चौकशीची मागणी
हा दहशतवाद संपवायचाय! अशोक चव्हाण यांची एसआयटी चौकशीची मागणी.
आमचा मागील रेकॉर्ड तोडू; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
आमचा मागील रेकॉर्ड तोडू; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास.
... तर तुम्हाला मिरची का झोंबली? संदीप देशपांडेंचा खोचक प्रश्न
... तर तुम्हाला मिरची का झोंबली? संदीप देशपांडेंचा खोचक प्रश्न.