पालकमंत्र्यांची अजूनही निवड झालेली नाही, अश्या गलथान कारभाराचा मी निषेध करतो- अजित पवार

पालकमंत्र्यांची निवडही आणखी रखडलेली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलंय.

पालकमंत्र्यांची अजूनही निवड झालेली नाही, अश्या गलथान कारभाराचा मी निषेध करतो- अजित पवार
| Updated on: Sep 12, 2022 | 12:41 PM

मुंबई : राज्यात नवं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर झाला. त्यानंतर पालकमंत्र्यांची निवडही आणखी रखडलेली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलंय. “अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची अजूनही निवड झालेली नाही, अश्या गलथान कारभाराचा मी निषेध करतो”, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे सरकारवर (Eknath Shinde) टीका केलीय. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.