Loksabhha Election 2024 | चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे यांच्यात संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांचा कल ‘या’ ‘नेत्याच्या बाजूने
Loksabhha Election 2024 | संभाजीनगरमधून कोणाला उमेदवारी मिळणार? उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांचा कल जाणून घेतला. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. सध्यातरी देशात NDA विरुद्ध INDIA असा सामना होण्याच चित्र आहे.

निवृत्ती बाबर
Loksabhha Election 2024 | सध्या देश आणि राज्य पातळीवरील राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष युती, आघाड्यांची मोर्चेबांधणी करच आहेत. उमेदवार निश्चितीसाठी बैठका सुरु आहेत. सध्यातरी देशात NDA विरुद्ध INDIA असा सामना होण्याची चित्र आहेत. एनडीएच नेतृत्व भाजपाकडे तर इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे. महाराष्ट्राची राजकीय स्थितीच वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षात फूट पडली आहे. एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधी पक्षात आहे, उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवू शकतो. त्याचीच चाचपणी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुर आहे.
सध्या मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीसाठी आढावा बैठका सुरु आहेत. ठाकरे गट ज्या मतदारसंघात ताकत आहे, तिथे आपला दावा सांगणार हे निश्चित. यात संभाजीनगर लोकसभा मतदराससंघ सुद्धा आहे. संभाजीनगरमधून कोणाला लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवायच हा उद्धव ठाकरेंसमोरचा प्रश्न आहे. संभाजीनगरमधून लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन दावेदार आहेत. अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. चंद्रकांत खैरे माजी खासदार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता.
संभाजीनगरचा कल कोणत्या उमदेवाराला?
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची? यासाठी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली. पण या बैठकीला त्यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांना बोलावल नाही. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल चंद्रकांत खैर यांच्याकडे असल्याच स्पष्ट झालं. य़ात जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख होते. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? हे लवकरच कळेल.
