अमेठीतून राहुल गांधी जिंकल्यास ते पंतप्रधान होतील : महाराणी अमिता सिंग

अमेठीतून राहुल गांधी जिंकल्यास ते पंतप्रधान होतील : महाराणी अमिता सिंग


अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. अमेठीतील राजघराण्याने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अमेठीचे महाराजा डॉ. संजय सिंह आणि महाराणी अमिता सिंह यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. अमेठीतून राहुल गांधी जिंकतील आणि देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास राजघराण्याती सदस्यांनी व्यक्त केला.

सिंह राजघराण्याने आज अमेठीतील मॉडेल माध्यमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला. अमेठीचा संपूर्ण विकास हा गांधी घराण्याने केला असल्याचा दावा या राजघराण्याने केला.

स्मृती इराणी फक्त इथं मतांच्या राजकारणासाठी आल्या आहेत. स्मृती इराणी इथे जिंकल्या तर त्या केवळ एक खासदार बनतील, पण राहुल गांधी जिंकले तर ते देशाचे पंतप्रधान बनतील, असे महाराणी अमिता सिंह म्हणाल्या.

उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघ हा गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे. सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गाधी हे अमेठी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. अमेठी हा काँग्रेसचा आणि त्यातही गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्यावेळी म्हणजे 2014 सालीही राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मैदानात उतरल्या होत्या. मात्र, 2014 सालीही त्यांचा पराभव झाला होता. यंदाही स्मृती इराणीच राहुल गांधींना टक्कर देत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI