AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी? शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहे. हे 14 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून नवा गट स्थापन करणार आहेत.

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी? शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 5:49 PM
Share

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी  सुप्रीम कोर्टाने (Supreme court) नेमलेल्या घटनापीठासमोर 20 जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. यानंतर  शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत पक्षप्रमुख पदाचा उल्लेख नाहीये, मात्र इतर पदांची आणि त्यावर नियुक्त नेत्यांची नावं शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेतील अनेक नेत्यांवर कारवाई केली जात असतानाच शिंदे गटाकडून आता ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

शिंदेंकडून नवी कार्यकारिणी जाहीर

शिवसेनेने  जारी केलेल्या कार्यकारिणीतील नियुक्त्या पुढीलप्रमाणे-

  • मुख्य नेता- एकनाथ शिंदे
  • मुख्य प्रवक्ते- दीपक केसरकर
  • उपनेते- तानाजी सावंत
  • उपनेते- यशवंत जाधव
  • उपनेते- गुलाबराव पाटील
  • उपनेते- उदय सामंत

दीपक केसरकर काय म्हणाले?

शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटासोबत असल्याची चर्चा आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, मला वाटतं आमच्याबरोबर सगळेच खासदार आहेत. कारण हिंदुत्वाचा विचार आमच्यासोबत आहे. त्यामुळे हाच विचार अधिक व्यापक प्रमाणावर पसरवण्यात आम्ही भूमिका असेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे दिल्लीत..

दरम्यान, महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचावरील सुनावणी येत्या बुधवारी घटनापीठासमोर होणार आहे. यानिमित्त कायदेशीर बाजूंत मार्गदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठी आणि कायदेशीर तज्ज्ञांचं ते मार्गदर्शन घेतील, अशी माहिती आहे.

14 खासदार उद्या फुटणार?

आज राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचे 14 खासदार फुटतील अशा चर्चा होत्या. मात्र प्रत्यक्षात तसं चित्र दिसलं नाही. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही स्पष्ट सांगितलं की, शिवसेनेचे सर्व खासदार आमच्या सोबत आहेत. मात्र राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहे. हे 14 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून नवा गट स्थापन करणार आहेत. या गटाचे संसदेतील गटनेते राहुल शेवाळे असतील. संसदेतील गटनेतेपदी त्यांनी नियुक्ती केली जाईल, अशीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.