AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतमोजणीपूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांची जय्यत तयारी, 10 हजार कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (24 ऑक्टोबर) होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे (Vote Counting). यासाठी दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मतमोजणीपूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांची जय्यत तयारी, 10 हजार कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक
| Updated on: Oct 23, 2019 | 6:11 PM
Share

मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (24 ऑक्टोबर) होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे (Vote Counting). यासाठी दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली (Vidhansabha 2019 Vote Counting).

मतमोजणीला गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरु होईल. दरम्यान, सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 269 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जातील.

सरासरी प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएमने ऑन करण्यासाठी एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे.

मतमोजणीवर कॅमेऱ्यांची नजर

स्ट्रॉंग रुम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रुममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी आणि नंतर पेट्या स्ट्रॉंग रुममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

स्ट्राँगरुम बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरुमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या eciresults.nic.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.