छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा, मनोज जरांगे यांची मागणी; ‘त्या’ विधानावरून आक्रमक

जुनाट नेत्याने सुपडा साफ करण्याचं स्वप्न बघू नये. एससी आणि एसटीला आमचा विरोध नाही. आमचं आरक्षण ओबीसीमध्ये आहे, तेच आम्ही मागत आहोत. जुनाट नेत्यावर वेळ आली म्हणून ते एससी आणि एसटीची मदत मागत आहेत. मात्र त्यांनी जे मागे राजकारण केलं होतं, ते लोक विसरलेले नाहीत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते.

छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा, मनोज जरांगे यांची मागणी; 'त्या' विधानावरून आक्रमक
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 1:04 PM

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 27 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आमची लायकी काय आहे हे सांगताना भुजबळ यांनी भीमा कोरेगावच्या लढाईसहीत अनेक उदाहरणे दिली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. या विधानाप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

सर्व समाजाचं कल्याण व्हावं असं आमचं सर्वांचं मत आहे. काही नेते तेढ निर्माण करत आहेत. मात्र, समाजाने शांत राहावं. भुजबळांनी मराठ्यांचे वाटोळं केले आहे. त्यांना तेढ निर्माण करायची आहे. त्यामुळे समाजाने शांत राहावं. मी संभाजी राजेंना सांगू शकतं नाही. मी त्या गादीचा सन्मान करतो. ओबीसी नेत्यांना तेढ निर्माण करायची आहे. त्यांची इच्छा पूर्ण होऊ देऊ नका. संघटना आक्रमक होत आहे. राजे आमच्या पाठिशी आहेत. राजकीय हेतू आहे की नाही हे माहीत नाही. समाज शांत राहील. संघटनेबद्दल समाजाला माहीत आहे. याला जबाबदार भुजबळ आहे. त्याची भाषा खूप वेगळी आहे. भीमकोरेगावच्या संदर्भाने त्यांनी जातीवाचक उद्घार काढलं. त्यांच्यावर गुन्हा दखल केला पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

अन्यथा समाचार घेऊ

गरज वाटली म्हणून तुम्ही दलित समाजाला जवळ करत आहात. दलितांनी मोर्चा काढला तेव्हा तुम्ही ते स्मारक धुवून काढलं होतं. सरकारने जुनाट नेत्याला रोखल पाहिजे. ओबीसी बांधव सोबत असताना भुजबळ म्हणता हातपाय तोडायची भाषा करतात. जुनाट नेत्यांचा विचार चांगला नाही. अशी भाषा असताना सरकार झोपलंय का? त्यांना आवरा अन्यथा आम्ही सभेत समाचार घेऊ, असा इशारा जरांगे यांनी दिला.

त्याचा अर्थ तो नाही

आमची परिस्थिती अशी की आम्ही हुशार असून आम्हाला काम करता येत नाही. आम्हाला झेंडे उचलायला लागत आहेत. यांनी परिस्थिती ओढून घेतली. यामुळे आंबेडकरांनी दिलेला सल्ला आम्ही मनाला आहे. आमचे सुशिक्षित बेकार झाले आहेत. त्यांच्या हाताखाली काम करत आहे. त्याचा अर्थ समाजाकडे असा नाही. मी सगळ्या जातीसाठी काम करतो. त्यांनी महार असा शब्द वापरला आहे. ऐतिहासिक संदर्भ होता आमच्याही बोलण्यात होतं. पण भुजबळ तुम्ही दलित बांधवांचा अपमान करत आहेत, असं ते म्हणाले.

आरक्षण दिल्यावर उद्योग येणार नाहीत का?

24 तारखेपर्यंत थांबा आम्ही सगळं सांगणार आहोत. तोवर थांबा. मराठ्यांनी आरक्षण मागितलं म्हणून उद्योग येणार नाहीत का? या अगोदर का आणले नाही? राजकीय नेते खूप हुशार असतात. आम्ही शांततेत आरक्षण मागितलं तर उद्योग येणार नाहीत असं सांगितलं जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

तेव्हा का वाईट वाटतं

मला त्यांनी नवीन नेते म्हटलं. मग मी त्यांना जुनाट आणि कुजलेले नेते म्हटल्यावर वाईट वाटण्याचं कारण काय? त्यांच्या पांढऱ्या केसांचा काय उपयोग झाला का? ते दंगली घडवत आहेत. अन् सरकार त्यांचं ऐकत आहे. नेत्यांनो राजकारण सोडायचं तर सोडा. काय करायचं ते करा. आम्हाला आरक्षण द्या. जुनाट ओबीसी नेत्यापासून काही नेते चार हात दूर गेले. त्यांना वाटत याच्या मांडीला मांडी लावून बसने म्हणजे भविष्य धोक्यात घालू असं वाटत आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.