Video : मोठी बातमी! चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण

महाराष्ट्रात दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती! कशी सापडली सोन्याची खाण?

Video : मोठी बातमी! चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 11:22 AM

मुंबई : महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी (Gold Mines in Maharashtra) असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातंय. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचं कळतंय.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे सोनं निघालं तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.  सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचंही सांगितलं जातंय.

राज्याच्या भूगर्भात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबात केलेला उल्लेख सगळ्यांचं लक्ष वेधणारा ठरला.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.