AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोम्मईंच्या ट्विटमागे नेमकं कोण, लवकरच कळेल.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा, कर्नाटक प्रश्नावरून विधानसभेत खडाजंगी!

मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्यांदा देशाच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर हस्तक्षेप केला. अनेक वर्षात हे पहिल्यांदा घडलं.

बोम्मईंच्या ट्विटमागे नेमकं कोण, लवकरच कळेल.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा,  कर्नाटक प्रश्नावरून विधानसभेत खडाजंगी!
Image Credit source: विधानसभा
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 19, 2022 | 2:07 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून (Maharashtra Karnataka border issue) आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सीमाप्रश्न आताच का चिघळला, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि फडणवीस-शिंदे यांच्यात सीमाप्रश्नारून काय चर्चा झाली, असे प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील अजितदादांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सांगली, सोलापुरातील गावांसदर्भात ट्विटमागे नेमकं कोण आहे, हेही लवकरच समोर येईल, असा इशारा दिला.  एवढंच नाही तर मागील अडीच वर्षात सीमावासियांच्या योजना मविआ सरकारने बंद पाडल्याचा गंभीर आरोपही एकनाथ शिंदे यांनी केली.

अधिवेशनात कर्नाटक सीमाप्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. काही गावांनी महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केले. पण अमित शाह आणि शिंदे यांच्या बैठकीत काय झालं?

खासदार धैर्यशील माने आज बेळगावात जाणार होते, मात्र कर्नाटक सरकारने त्यांनाही मनाई केली. यावरून अजित पवार आक्रमक झाले. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्र एकिकरण समिती तिथे सातत्याने लढा देतेय. अमित शहांसमोर ठरलेलं असताना जिल्हाधिकारी खासदारावर बंदी कशी आणू शकतो?

खासदार हा 22 ते 25 लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करतो, खासदारांनी जायला पाहिजे. कोर्टातला निकाल तिथे लागेल पण आपण ही दडपशाही स्वीकारू नये. बोमईंनी अमित शहांसमोर कबूल केलं असताना ही दडपशाही का सुरु आहे, असा सवाल अजित पवार यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना खाली बसण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर काय झालं, असा प्रश्न विचारला जातोय त्यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्यांदा देशाच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर हस्तक्षेप केला. अनेक वर्षात हे पहिल्यांदा घडलं.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषयावर आम्ही ठोस भूमिका घेतली. आमच्या गाड्या, लोक जातात, त्यांना अडवलं जातं. हे कायदा व सुव्यवस्थेला धरून नाही, ही स्थिती आम्ही बोलून दाखवली. या अॅक्शनला रिअॅक्शन होऊ शकते, हेदेखील आम्ही अमित शहांसमोर मांडलं.

गृहमंत्र्यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना योग्य समज दिली. अशा प्रकारच्या घटना होता कामा नये, अशा सूचना दिल्या. माध्यमांसमोर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली. यापूर्वी कोण-कोणती सरकारं महाराष्ट्रात आणि केंद्रात होती, हे माहिती आहे. कोणत्या सरकारने या आंदोलनांना मान्य केले, हे माहिती आहे… या प्रश्नावरून राजकारण आम्हाला करायचं नाही.

विविध गावं कर्नाटकात जाण्याचा ठराव करत आहेत, या ठरावाच्या मागे कुठले पक्ष आहेत, याचीही माहिती पोलिसांकडून आमच्याकडे आली आहे. जत तालुक्यातील 48 हजार कोटी रुपयांची पाणी योजना कालच मंजूर केल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीने सीमावासियांसाठीच्या योजना बंद केल्या, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमागे कोण आहे हेदेखील लवकरच कळेल, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा