AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022, Ward 31 : बदललेल्या राजकीय समीकरणामध्येही राष्ट्रवादी बालेकिल्ला राखणार की भाजप मुसंडी मारणार? जाणून घ्या सध्याची स्थिती

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये राष्ट्रवादी पक्ष आपला दबदबा कायम राखतोय की बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजप मुसंडी मारतोय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

TMC Election 2022, Ward 31 : बदललेल्या राजकीय समीकरणामध्येही राष्ट्रवादी बालेकिल्ला राखणार की भाजप मुसंडी मारणार? जाणून घ्या सध्याची स्थिती
ठाणे महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Aug 16, 2022 | 11:32 AM
Share

ठाणे : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला लागून असलेले ठाणे शहर. या शहराची व्याप्ती मागील काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. केवळ आकारानेच नव्हे तर विकासाच्या दृष्टीकोनातूनही ह्या शहराने उत्तम उदाहरण निर्माण करून दिले आहे. आता तर ह्याच शहराचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे यंदा होणारी येथील महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) अत्यंत चुरशीची पाहायला मिळणार आहे. महापालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना बहुमत मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने 2012 मध्ये जितक्या जागा जिंकल्या, तितक्याच जागा आपल्या ताब्यात राखल्या होत्या, तर याचदरम्यान शिवसेने (Shivsena)चा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या ठाण्यात भारतीय जनता पक्षाने कामगिरीत सुधारणा दाखवून अधिकच्या जागा आपल्या पदरात पडून घेतल्या होत्या. आता तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंड पुकारून भाजपसोबत राज्याच्या सत्तेत आहेत. या सर्व बदललेल्या राजकीय घडामोडींचा विचार करता ठाण्याची निवडणूक संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेईल, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. याच महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये राष्ट्रवादी पक्ष आपला दबदबा कायम राखतोय की बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजप मुसंडी मारतोय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाणे महापालिका निवडणूक वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

आरक्षण सोडतीमध्ये नेमके काय घडले?

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार 47 पैकी 24 प्रभागांमध्ये महिला राज येणार हे निश्चित झाले आहे. पूर्वी 33 प्रभाग होते, ते आता 47 झाले आहेत. यंदा तीन पॅनल पद्धतीने ही निवडणूक होणार असून 24 प्रभागांमध्ये दोन महिला नगरसेवकांचे वर्चस्व असेल. 24 प्रभागांतील दोन जागांवर महिलांचे आरक्षण असणार आहे. प्रभाग क्रमांक 31 मधील 31 ब हा वॉर्ड सर्वसाधारण आरक्षित प्रभाग म्हणून जाहीर झाला आहे.

प्रभाग क्रमांक 31 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 43830 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 4107 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 2617

ठाणे महापालिका निवडणूक वॉर्ड 31 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागामध्ये कोणत्या विभागांचा समावेश ?

प्रभाग क्रमांक 31 हा विटावा, सूर्य नगर या नावाने ओळखला जातो. या प्रभागामध्ये विटावा, सूर्य नगर, भोळा नगर, वाघोबा नगर आदी प्रमुख विभागांचा समावेश होतो.

मागील निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक

31 अ – सुनिता पांडुरंग सातपुते 31 ब – रुपाली चंदन गोटे 31 क – राजन नारायण किणे 31 ड – मोरेश्वर नारायण किणे

ठाणे महापालिका निवडणूक वॉर्ड 31 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 31 मधील विजयी पक्ष

या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडे एक जागा आपल्या ताब्यात घेऊन चारही जागांवर आपला विजयी झेंडा फडकावला होता.

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरचे महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना – 67 राष्ट्रवादी – 34 भाजप – 23 काँग्रेस – 3 एमआयएम – 2 अपक्ष – 2

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना