राज्यात कोणाचं सरकार येणार? सर्वपक्षीय आमदार संभ्रमात

महासेनाआघाडीच्या बैठकांचे सत्र सुरु असताना दुसरीकडे आमदारांसह कार्यकर्तेही संभ्रमात (Maharashtra political crisis) आहेत.

राज्यात कोणाचं सरकार येणार? सर्वपक्षीय आमदार संभ्रमात

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा 27 व्या दिवशीही कायम (Maharashtra political crisis) आहे. एकीकडे महासेनाआघाडीच्या बैठकांचे सत्र सुरु असताना दुसरीकडे आमदारांसह कार्यकर्तेही संभ्रमात (Maharashtra political crisis) आहेत. नक्की चर्चेतून अंतिम बाहेर काय येईल? यावर अद्याप निर्णय झालेला आहे. त्यामुळे चर्चांचे सत्र वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली (Maharashtra political crisis) आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तिन्ही पक्ष वेगळ्या विचारधारेचे असल्याने आघाडी व्हायला वेळ लागत आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका होत आहेत. पण या बैठकांच्या फेऱ्यांबरोबर कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर काही कार्यकर्ते वेळात वेळ काढून राडकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला आहे. तरीसुद्धा अद्याप सरकार स्थापना झालेली नाही. त्यात राजकीय पक्षांचे नेते वेगवेगवळी विधान करत आहे. त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात आमदारांसोबत पक्षातील नेतेही बुचकाळ्यात पडले (Maharashtra political crisis) आहेत.

राज्यात नव्या समीकरणांची नांदी होऊ घातली आहे. एकत्र विधानसभा लढलेले भाजप शिवसेना आता आमनेसामने ठाकले आहेत. त्यात भाजप सरकार बनवण्याचा जोरदार दावा करत आहे. अशा परिस्थितीत जितकी महासेनाआघाडी बनायला उशीर होईल तितका नेत्यांसह कार्यकर्ते, सामान्य जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.

सोनिया गांधींचा हिरवा कंदील?

दरम्यान राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI