महाविकास आघडीनं दंगेखोरांना पाठीशी घातलं- जगदीश मुळीक ; भाजपने धरणे आंदोलन करत व्यक्त केला निषेध

त्रिपुरा येथे मशीद पाडल्याची हिंसाचार घडल्याची खोटी अफवा पसरवत, महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक धार्मिक दंगली घडवल्या. रझा अकादमीने मोर्चे काढत दंगली घडवण्यास पोषक वातावरणाची निर्मिती करत हिंसाचार घडवला. मात्र महाविकास आघाडी सरकारने दंगली घडवणाऱ्यांना पाठीशी घातलं.

महाविकास आघडीनं दंगेखोरांना पाठीशी घातलं- जगदीश मुळीक ; भाजपने धरणे आंदोलन करत व्यक्त केला निषेध
BJP - Jagdish Mulik
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 12:27 PM

पुणे – काही दिवसांपूर्वी त्रिपुरा येथील मशिदीच्या घटनेचं पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. अनेक शहरात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्यांच्या दरम्यान मालेगाव , नांदेड व अमरावतीमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ भाजपनं आज पुण्यात धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी, पुणे शहर यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आलं. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वात हे धरणे आंदोलन करण्यात आलं.

रझा अकादमीने दंगलीस पोषक वातावरणाची निर्मिती केली  

त्रिपुरा येथे मशीद पाडल्याची हिंसाचार घडल्याची खोटी अफवा पसरवत, महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक धार्मिक दंगली घडवल्या. रझा अकादमीने मोर्चे काढत दंगली घडवण्यास पोषक वातावरणाची निर्मिती करत हिंसाचार घडवला. मात्र महाविकास आघाडी सरकारने दंगली घडवणाऱ्यांना पाठीशी घातलं. याउलट शांततेसाठी व स्वतः:च्या सरंक्षणासाठी रस्त्यावर उतरलेलया नागरिकांवर लाठीचार्ज करत खोटे गुन्हे दाखल केले. असा आरोप जगदीश मुळीक यांनी आंदोलना दरम्यान केला.

इतकंच नव्हे तर महाविकस आघाडीनं दंगेखोरांना पाठीशी घातलं महाविकास आघाडीमुळंच या दंगली महाराष्ट्रात होत आहेत. त्याचाच निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. या कृतीसाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारचा निषेध करतो. असेही जगदीश मुळीक म्हणाले. या आंदोलनात युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने घटनेतील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी या वेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

जमाव बंदीचे आदेश
‘हिंदू के सन्मान मै भाजप है मैदान मै’ अशी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली. ‘हल्लाबोल’ , ‘जय श्रीरामाच्या घोषणा’ ही देण्यात आल्या. या दंगलीमुळे पुण्यातील ग्रामीण भागातही कलम 144 चे आदेश देत जमावबंदी लागू करण्यात आली होती. याबरोबरच राज्यातील मालेगाव, औरंगाबाद, अमरावती, नांदेडसहा ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या:

पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस, हवामान खात्याची माहिती; अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून, विषप्राशन केलेल्या पुण्यातील पतीचाही अखेरचा श्वास

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह