धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह

पुण्यातील मुंढवा परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या वेटरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे या वेटरचे नाव आहे.

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह


पुणे : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या वेटरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे या वेटरचे नाव आहे. त्याने हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हॉटेलमधील लोकांनी फसवल्याचा आरोप 

अरविंद सिंह याने हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून, आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांने फेसबूक लाईव्ह देखील केले होते. हॉटेलमधील काही लोकांनी आपल्याला फसवले असल्याचा आरोप त्याने आत्महत्येपूर्वी केला होता. आपली फसवणूक झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले. त्यानंतर अरविंद सिंह यांनी तेराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

एक महिन्यापूर्वीच लागला होता कामाला

अरविंद हा मूळचा उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे. एक महिन्यापूर्वीच तो पुण्यात कामाला लागला होता. तो हॉटलेच्या पेंट हाऊसमध्ये राहात होता. मात्र त्याने आचानक आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्याला हॉटेलमधील काही लोकांनी फसवल्याचा आरोप त्याने आत्महत्येपूर्वी केला होता. दरम्यान त्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या 

MAHA TET: महाटीईटी परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार, प्रवेशपत्रही जाहीर

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पुण्यात लोहगाव विमानतळावर1 डिसेंबरपासून ‘विंटर शेड्युल’ सुरु

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI