पवारांच्या नातवाच्या समर्थनार्थ पद्मसिंहांचा नातू मैदानात, पार्थ यांना फायटरची उपमा

| Updated on: Aug 13, 2020 | 10:55 AM

आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे, असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे

पवारांच्या नातवाच्या समर्थनार्थ पद्मसिंहांचा नातू मैदानात, पार्थ यांना फायटरची उपमा
Follow us on

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याबद्दल टिप्पणी केल्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांना समर्थन दिले. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले होते. (Malhar Patil backs Parth Pawar as Sharad Pawar calls him Immature)

‘आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे’ असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. माझी पोस्ट राजकीय नसून, पार्थ पवार यांच्या प्रेमापोटी व आपुलकीने केल्याचे स्पष्टीकरण मल्हार पाटील यांनी दिले.

पार्थ पवार आणि मल्हार पाटील यांचे नाते

मल्हार पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू, तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे  काका-पुतण्याचे नाते लागते. मात्र वयात फारसे अंतर नसल्याने दोघेही चांगले मित्र आहेत. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाने गेल्याच वर्षी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील उस्मानाबादमधून आमदारपदी निवडून आले.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती. (Malhar Patil backs Parth Pawar as Sharad Pawar calls him Immature)

संबंधित बातम्या :

पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

अजितदादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार : जयंत पाटील

शरद पवार म्हणाले, तो इमॅच्युर, आता पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया…..

“मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही” भाजप पदाधिकाऱ्याचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

पवारांनी नातवाला इमॅच्युअर म्हटलं, आता नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं – निलेश राणे

(Malhar Patil backs Parth Pawar as Sharad Pawar calls him Immature)