AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातील ‘हा’ नेता ठरवणार

कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार? डी के शिवकुमार की सिद्धरामय्या? जवळपास निश्चित, 'हा' नेता घेणार निर्णय

कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातील 'हा' नेता ठरवणार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 15, 2023 | 11:25 AM
Share

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याबद्दल कर्नाटकसह देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. दोन नावं या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. यापैकी कुणाच्या गळ्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे. यासाठी काँग्रेसच्या केंद्रातील नेत्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे निर्णय घेणार आहेत. या सगळ्याची जबाबदारी खर्गेंच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान 18 मेला शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे.

कर्नाटकचं मुख्यमंत्री कोण होणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची धुरा दिली जाऊ शकते अशी माहिती आहे. तर डी के शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं सांगितलं जातंय. मात्र मल्लिकार्जुन खर्गे याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत.

डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणत ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

मल्लिकार्जुन खर्गे आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील.

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सत्ता स्थापनेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे बंगळुरूत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटक सरकार स्थापनेबाबत मोठी जबाबदारी आहे.

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी दोन नावं आघाडीवर आहेत. सिद्धारमैया आणि डी के शिवकुमार यांची नाव चर्चेत आहेत. सिद्धरामय्या हे कर्नाटक विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राहिले आहेत. तर डीके शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या रेस पाहायला मिळतेय. आता काँग्रेस हायकमांड कुणाच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा देतात हे पाहणं महत्वाचं असेल.

जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार-डी के शिवकुमार

मुख्यमंत्रिपदासाठी डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. माध्यमांशी बोलताना डी के शिवकुमार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष माझ्यावर कोणतीही जबाबदारी देईल, त्यासाठी मी तयार आहे. ती जबाबदारी स्विकारायला आणि पार पाडायला मी तयार आहे, असंही डीके शिवकुमार म्हणालेत.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय