AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, ऐन वेळी निवडणुकीत पराभव, सुवेंदू अधिकारी यांचा दणदणीत विजय!

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, ऐन वेळी निवडणुकीत पराभव, सुवेंदू अधिकारी यांचा दणदणीत विजय!
mamata banerjeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2026 | 9:40 PM
Share

Mamata Banerjee Election Result : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पाणी पाजत भाजपाने तेथे सत्ता खेचून आणली आहे. दुसरीकडे काहीही झालं तरी आम्हीच निवडणूक जिंकणार असं म्हणणाऱ्या तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तृणमूलचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. या पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत विजय होणार की पराभव? याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर या मतदारसंघाचा निकाल समोर आला असून ममता बॅनर्जी यांना जबर धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल 15 हजार मतांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले आहे.

सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून या जागेवरून कधी ममता बॅनर्जी आघाडीवर जात होत्या. तर कधी सुवेंदू अधिकारी मसुंडी मारताना दिसत होत्या. अजूनही त्या जागेवरची मतमजोणी चालूच होती. आता तेथील निकाल स्पष्ट झाला आहे. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनाच पराभवाला समोरे जावे लागल्याने तृणमूलासाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

कोणाला किती मतं पडली

सुवेंदू अधिकारी या जागेवरून 15114 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांना एकूण 73463 मतं मिळाली आहेत. या विजयानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ममता बॅनर्जी यांना पराभूत करणे फार महत्त्वाचे होते. हिंदू मतदारांनी मला विजयापर्यंत नेलं. आमच्या मेहनतीला फळ लागले आहे, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली.

कोणत्या पक्षाला किती जागा?

पश्चिम बंगालमध्ये एकूण 293 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी 208 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर तृणमूल काँग्रेसचा फक्त 79 जागांवर विजय झाला आहे. काँग्रेसला दोन जागा तर डाव्या पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. एमआयएम पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

Follow Us
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल