पनवेलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पैसे वाटणारा अटकेत

पनवेल (रायगड) : पनवेलमधील सुकापूर येथील गोकुळधाम भागात पैसे वाटप करताना आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रताप आरेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडे पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे. सुकापुर येथील गोकुळधाम येथे आज दुपारी प्रताप आरेकर याला अटक करण्यात आली. या प्रताप आरेकरकडे मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रावादी …

maval loksabha election, पनवेलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पैसे वाटणारा अटकेत

पनवेल (रायगड) : पनवेलमधील सुकापूर येथील गोकुळधाम भागात पैसे वाटप करताना आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रताप आरेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडे पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे.

सुकापुर येथील गोकुळधाम येथे आज दुपारी प्रताप आरेकर याला अटक करण्यात आली. या प्रताप आरेकरकडे मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रावादी काँगेसचे पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे. तसेच, 200 रुपयांची 29 पाकिटेही प्रताप आरेकरकडून जप्त करण्यात आली आहेत. प्रताप आरेकर हा पार्थ पवारांसाठी काम करत असल्याचा संशय बळावला आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे कर्मचारी पथक अधिक चौकशी करत आहे.

पार्थ पवारांसाठी पैसे वाटप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात

मावळ लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. पनवेल भागातून निवडणूक आयोगाच्या पथाकने आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. कालच (27 एप्रिल) कामोठे येथे शेकाप आणि राष्ट्रवादीच्या दोन जणांना अटक करण्यात आली होती.

पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे टक्कर

मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून श्रीरंग बारणे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पार्थ पवार हे उमेदवार आहेत. पवार कुटुंबातील व्यक्तीसाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मावळमध्ये प्रचार केला. विशेष म्हणजे पार्थ यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मावळ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *