Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात! प्रत्येक जिल्ह्यात येणार.. मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन
मनोज जरांगे पाटील हे 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. चार ते पाच टप्प्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे दौरे होणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र, व्हॅलिडीटी यासह विविध समस्यांवर मनोज जरांगे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधवांसोबत संवाद साधणार आहेत.

रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी अन् महत्त्वाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील हे 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. चार ते पाच टप्प्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे दौरे होणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र, व्हॅलिडीटी यासह विविध समस्यांवर मनोज जरांगे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधवांसोबत संवाद साधणार आहेत. 1 डिसेंबरला कोणत्या जिल्ह्याला कोणत्या दिवशी जायचं आहे, जाहीर करणार असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील?
“सात डिसेंबरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल, तसेच कुणबी प्रमाणपत्राबाबत अडी अडचणी जाणून घेण्यासाठी दौरे करणार आहे. यामध्ये सभा. बैठका नसतील. ठिकाण आपण १ डिसेंबपासून जाहीर केले जाईल आणि ठिकाण त्या त्या जिल्ह्यातील बांधव ठरवतील. त्यामध्ये काही टप्पे पाडता येतील. ७ दिवसांचा टप्पा, आठ दिवसांचा १२ दिवसांचा टप्पा असे टप्पे पाडूया,” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस….!
“आता ७ डिसेंबरपासून सलग हे दौरे सुरु होतील. प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस दिला जाईल या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये ना सभा असेल ना बैठक असेल. फक्त त्या जिल्ह्यातील मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्राबाबत काय अडचण आहे ती जाणून घ्यायची आहे. प्रत्येक मराठा बांधवाला अंतरवालीमध्ये येणे होत नाही, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव जालन्यात येऊ शकत नाहीत, विदर्भ मराठवाड्यातला बांधव अंतरवालीमध्ये येऊ शकत नाही, खानदेश, मुंबईकडील बांधवांना अंतरवालीमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे मीच तुमच्या जिल्ह्यात येत आहे,” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, “तुमच्या जिल्ह्यात मी येणार आहे. गावागावातील मराठा बांधवांनी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र का दिले जात नाही. काय अडचणी आहेत? याबाबतच्या समस्या मांडा अन् जिल्ह्यामध्ये जे ठिकाण दिले असेल त्याठिकाणी यावे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.