AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात! प्रत्येक जिल्ह्यात येणार.. मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

मनोज जरांगे पाटील हे 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. चार ते पाच टप्प्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे दौरे होणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र, व्हॅलिडीटी यासह विविध समस्यांवर मनोज जरांगे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधवांसोबत संवाद साधणार आहेत.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात! प्रत्येक जिल्ह्यात येणार.. मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन
| Updated on: Nov 23, 2026 | 4:22 PM
Share

रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी अन् महत्त्वाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील हे 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. चार ते पाच टप्प्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे दौरे होणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र, व्हॅलिडीटी यासह विविध समस्यांवर मनोज जरांगे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधवांसोबत संवाद साधणार आहेत. 1 डिसेंबरला कोणत्या जिल्ह्याला कोणत्या दिवशी जायचं आहे, जाहीर करणार असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील?

“सात डिसेंबरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल, तसेच कुणबी प्रमाणपत्राबाबत अडी अडचणी जाणून घेण्यासाठी दौरे करणार आहे. यामध्ये सभा. बैठका नसतील. ठिकाण आपण १ डिसेंबपासून जाहीर केले जाईल आणि ठिकाण त्या त्या जिल्ह्यातील बांधव ठरवतील. त्यामध्ये काही टप्पे पाडता येतील. ७ दिवसांचा टप्पा, आठ दिवसांचा १२ दिवसांचा टप्पा असे टप्पे पाडूया,” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस….! 

“आता ७ डिसेंबरपासून सलग हे दौरे सुरु होतील. प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस दिला जाईल या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये ना सभा असेल ना बैठक असेल. फक्त त्या जिल्ह्यातील मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्राबाबत काय अडचण आहे ती जाणून घ्यायची आहे. प्रत्येक मराठा बांधवाला अंतरवालीमध्ये येणे होत नाही, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव जालन्यात येऊ शकत नाहीत, विदर्भ मराठवाड्यातला बांधव अंतरवालीमध्ये येऊ शकत नाही, खानदेश, मुंबईकडील बांधवांना अंतरवालीमध्ये येऊ शकत नाही.  त्यामुळे मीच तुमच्या जिल्ह्यात येत आहे,” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, “तुमच्या जिल्ह्यात मी येणार आहे. गावागावातील मराठा बांधवांनी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र का दिले जात नाही. काय अडचणी आहेत? याबाबतच्या समस्या मांडा अन् जिल्ह्यामध्ये जे ठिकाण दिले असेल त्याठिकाणी यावे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Follow Us
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...