‘मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी मोदींबाबत 3 गोष्टी स्पष्ट केल्या’, पाटल्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा

| Updated on: May 24, 2021 | 8:31 PM

खासदार संभाजीराजे यांनी मोदींच्या भेटीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी मोदींबाबत 3 गोष्टी स्पष्ट केल्या, पाटल्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या राजकारण आता अधिक जोर धरताना दिसून येत आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी (MP Sambhaji Chhatrapati ) भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. त्यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांतदादांवर जोरदार निशाणा साधलाय. (Sachin Sawant criticizes Chandrakant Patil on Maratha reservation)

“चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानातून त्यांनी 3 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 1 – मोदींची विषयांची समज फार कमी आहे. 2 – मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. 3 – छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे”, असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय.

चंद्रकात पाटील काय म्हणाले?

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 3 वेळा भेट मागितली. पण अद्याप ती मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावर बोलताना मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. सोमवारी पुण्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार सविस्तरपणे बोलणे टाळले. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त केली.

‘पंतप्रधान मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही’

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अलिप्त भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन; संभाजीराजे छत्रपती कडाडले

आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय, संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका

Sachin Sawant criticizes Chandrakant Patil on Maratha reservation