शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे नाराज! पुरातत्व खात्याला फटकारलं

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे नाराज! पुरातत्व खात्याला फटकारलं

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारल्यामुळे आता त्यावर तातडीने कारवाईची शक्यता आहे.

सागर जोशी

|

Feb 18, 2021 | 9:40 PM

मुंबई : रायगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. त्यावरुन शिवरायांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारल्यामुळे आता त्यावर तातडीने कारवाईची शक्यता आहे.(MP Sambhaji Raje is displeased with the lighting system on Raigad fort)

‘भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल’, अशा शब्दात संभाजीराजेंनी पुरातत्व खात्यावर शरसंधान साधलं आहे.

“त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो”, अशी खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश

शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात पुरातत्व विभागानं मान्यता दिली. एरवी किल्ल्यावर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किल्ल्यावर पर्यटकांना परवानगी असते.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणारा कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. शिवजयंती दिनी मुंबईत कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे मराठा संघटना आणि शिवभक्त अधिक आक्रमक झाले आहेत.

संबंधित बातम्या :

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

MP Sambhaji Raje is displeased with the lighting system on Raigad fort

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें