शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

पोलिसांनी काहीवेळातच शिवसेना भवनासमोर लावलेला हा बॅनर उतरवला. | Shivjayanti 2021

शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी
पोलिसांनी काहीवेळातच शिवसेना भवनासमोर लावलेला हा बॅनर उतरवला. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 11:46 AM

मुंबई: राज्य सरकारने शिवजयंतीच्या सोहळ्यावर (Shivjayanti 2021) घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करून निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला झालेली गर्दी किंवा शरद पवारांचा वाढदिवस असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रा यावेळी झाली गर्दी त्यामुळे करोना होत नाही का, असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला विचारण्यात आला आहे. (Maratha Kranti Morcha on Shivjyanti 2021)

मात्र, पोलिसांनी काहीवेळातच शिवसेना भवनासमोर लावलेला हा बॅनर उतरवला. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या सोहळ्यावर लादलेल्या निर्बंधांमुळे राज्य सरकारवर सध्या टीकेचा भडीमार होत आहे. राज्य सरकारने शिवजयंतीच्या दिवशी मुंबईत 144 कलम लागू करण्याचाही निर्णय घेतला आहे. परिणामी विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत.

जयंतीचे ऑनलाईन प्रक्षेपण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असं गृहविभागाने परिपत्रकात म्हटलं आहे.

बाईक रॅली, प्रभात फेरीला मज्जाव

तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे. संबंधित बातम्या

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली

(Maratha Kranti Morcha on Shivjyanti 2021)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.