शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश

शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 9:09 PM

रायगड : शिवजयंतीनिमित्त सरकारने शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात पुरातत्व विभागानं मान्यता दिली. एरवी किल्ल्यावर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किल्ल्यावर पर्यटकांना परवानगी असते.(2 days free admission to Raigad fort on Shiv Jayanti day)

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणारा कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. शिवजयंती दिनी मुंबईत कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे मराठा संघटना आणि शिवभक्त अधिक आक्रमक झाले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाची बॅनरबाजी

राज्य सरकारने शिवजयंतीच्या सोहळ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करून निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला झालेली गर्दी किंवा शरद पवारांचा वाढदिवस असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रा यावेळी झाली गर्दी त्यामुळे करोना होत नाही का, असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला विचारण्यात आला आहे.

मात्र, पोलिसांनी काहीवेळातच शिवसेना भवनासमोर लावलेला हा बॅनर उतरवला. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या सोहळ्यावर लादलेल्या निर्बंधांमुळे राज्य सरकारवर सध्या टीकेचा भडीमार होत आहे.

100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघ्या दहा लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर अखेर राज्य सरकार बॅकफूटवर आलं आहे. सरकारने अखेर नवी नियमावली जारी करून शिवजयंतीला आता 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने हे नवीन परिपत्रक जारी केलं आहे.

बाईक रॅली, प्रभात फेरीला मज्जाव

तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

2 days free admission to Raigad fort on Shiv Jayanti day

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.